Homeमहाराष्ट्रलासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना धानोरे शिवारात घडली आहे. याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मे 2026 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास सोनाली दत्तात्रय तासकर (वय 30, रा. धानोरे शिवार) या आपल्या शेतात गवत काढत होत्या. त्यावेळी आरोपी बाबासाहेब माधव तासकर, ओमकार बाबासाहेब तासकर आणि आदित्य बाबासाहेब तासकर हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेताची मशागत करत होते.

सामायिक बांधावरील लोखंडी अँगल का वाकवला, असा जाब विचारत सोनाली तासकर यांनी मोबाईलवर व्हिडिओ चित्रिकरण सुरू केले. याचा राग आल्याने आरोपींनी शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला केला.

तक्रारीनुसार, बाबासाहेब तासकर यांनी सोनाली यांच्या केसांना धरून त्यांना खाली पाडले व लाकडी काठीने डोक्यावर तसेच उजव्या हाताच्या मनगटावर मारहाण केली.

पतीला देखील धमकी

आरडाओरड ऐकून सोनाली यांचे पती दत्तात्रय तासकर मदतीसाठी धावून आले. मात्र आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत “पुन्हा आमच्या नादी लागलात तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच महिलांची साडी फाडून नुकसान केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल

सोनाली तासकर यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलिस ठाण्यात बाबासाहेब माधव तासकर, ओमकार बाबासाहेब तासकर, आदित्य बाबासाहेब तासकर यांच्यासह एका अन्य व्यक्तीविरोधात मारहाण, शिवीगाळ, विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!