Homeताज्या बातम्याडॉ पी ए इनामदार यांच्या पुढाकाराने पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीमधील मजल्याचा उपयोग...

डॉ पी ए इनामदार यांच्या पुढाकाराने पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीमधील मजल्याचा उपयोग संशयित रुग्णांच्या क्वारंटाईनसाठी…

 पी ए डॉइनामदार यांच्या पुढाकाराने पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीमधील मजल्याचा उपयोग संशयित रुग्णांच्या क्वारंटाईनसाठी…
सध्या देशावर कोरोना विषाणू संकट असून ते परत लावण्यासाठी शासकीय प्रयत्नात जबाबदार नागरीक म्हणून व संस्था म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडण्यास तयार आहोत.

पुण्यातील मध्यवर्ती पेठांमधील कोरोना संसर्गाची वाढता प्रभाव लक्षात घेता कॅम्प, भवानी पेठ, नाना पेठ ला लागून असणाऱ्या आझम कॅम्पस च्या इमारतीमधील जागा संशयित रुग्णांच्या क्वारंटाईन साठी प्रशासनाला देण्याची तयारी व्यवस्थापनाने दर्शवली होती.

हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वीकारला असून तसे पत्र कॅम्पसचे अध्यक्ष डॉ.पी.ए. इनामदार यांना दिले आहे.

प्रशासनाच्या दिलेल्या पत्रानंतर ही जागा ताब्यात देण्यासाठी स्वच्छता आणि सुविधांची तयारी बुधवारपासून सुरु झाली आहे. आझम कॅम्पस मधील प्रार्थना स्थळाच्या पहिल्या मजल्यावरील ९००० चौरस फुट (Sq Ft) जागा सर्व आवश्यक असलेले वीज, पंखे, स्वच्छतागृह, पार्किंग सुविधांसह देण्याची तयारी येथील व्यवस्थापनाने दर्शवली होती. येथे आलेल्या संशयित रुग्णांची नाश्ता, जेवणाची व्यवस्था करण्याची, पोलीस बंदोबस्त आणि शासकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याची तयारी असल्याचे जिल्हाधिकार्यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते. आझम कॅम्पस मधील शैक्षणिक सुविधा चालु सुरु होईपर्यंत ही जागा शासनाला उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे या पत्रात म्हटले होते. त्यानुसार सर्व सुविधांसह हा मजला तयार झाला असल्याची माहिती आझम कॅम्पसचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांनी एका पत्राद्वारे दिली.

आझम कॅम्पस परिसरामध्ये महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ३० शैक्षणिक अस्थापना असून २४ एकर मध्ये हा परिसर आहे. त्यातील एका भागात पुर्वीपासून मशीद आहे. या मशिदीतील पहिल्या मजल्यावर ९ हजार चौरस फुटाचा सभागृहासारखा मजला आहे. त्याचे रुपांतर क्वारांटाइन वार्ड मध्ये करता येणे शक्य आहे. येथील शैक्षणिक इमारतींमधील शाळा ,महाविद्यालये सध्या बंद आहेत.लागेल तेव्हा आणखी जागा देण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनासमोर आहे,असेही डॉ.पी ए इनामदार यांनी सांगितले.

कोरोना हे देशावर खूप मोठ्ठे संकट असून ते परतवुन लावण्याच्या शासकीय प्रयत्नात जबाबदार नागरिक म्हणून , संस्था म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडण्यास तयार आहोत. आपल्याकडील साधने सरकारी यंत्रणेच्या मदतीला देण्याची ही वेळ आहे असे डॉ.इनामदार यांनी सांगितले.

दरम्यान रमजानच्या पवित्र महिन्यात मशिदींमध्ये न जाता घरीच नमाज पठण करण्याचे आवाहनही डॉ. पी. ए. इनामदार यांनी केले आहे. कॅम्पस मधील युनानी मेडिकल कॉलेजचे २५ डॉक्टर्स ५ रुग्ण वाहीकांमधून पेठांमध्ये रुग्ण सेवा करीत आहेत. तसेच आझम कॅम्पसने आतापर्यंत २७ लाखाहुन अधिक किमतीचे किराणा सामान गरजूंना वितरीत केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्‌महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड राहुल आढाव) दौंड शहरातील बोरावके नगर ते देव पामपर्यंतचा रस्ता विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासन व दौंड नगरपरिषद अंतर्गत मंजूर...

बोगस लॅबोरेटरींना शासनाचे संरक्षण? जनतेचे आरोग्य धोक्यात; सुरक्षित आरोग्य जनतेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk:राज्यात सुमारे ८००० हून अधिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ....

गांधी चौकात रात्री १२.३० ला काँक्रीट मिक्सरचा गडगडाट – नगरपालिकेची मंजुरी आहे का?

0
मध्यरात्रीची घाई कशासाठी? दौंडमध्ये रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात संघराज गायकवाड, राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : शहरातील गांधी चौक परिसरात जोगळेकर हॉटेलच्या मागील भागात काल रात्री...

निसर्ग मित्र समितीकडून ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियानासाठी निवेदन

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी जळगाव, प्रतिनिधी (विनोद पवार) : होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावा, यासाठी ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान राज्यभर राबविण्याची...

कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी

0
ग्रामस्थ व ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट’चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कुंड खुर्द (ता. मलकापूर), प्रतिनिधि : ग्राम कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्यात यावे, अशी...

error: Content is protected !!