Homeताज्या बातम्यामध्यरात्री कारमधून चालला होता दारूचा साठा; ब्रह्मपुरी पोलिसांच्या 'गुप्त' जाळ्यात तस्कर अडकले!

मध्यरात्री कारमधून चालला होता दारूचा साठा; ब्रह्मपुरी पोलिसांच्या ‘गुप्त’ जाळ्यात तस्कर अडकले!

 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : मौजा हळदा भागात गोसेखुर्द कालव्याच्या मार्गाने कारमधून चाललेली देशी दारूची चोरटी वाहतूक ब्रह्मपुरी पोलिसांनी नाकाबंदी करून उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५,००० बाटल्या देशी दारू आणि गुन्ह्यात वापरलेली फोर्ड फिगो कार, असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हळदा बस स्टॉपकडून गोशाळेजवळील गोसेखुर्द कालव्याच्या पारीने एका निळ्या रंगाच्या कारमधून देशी दारूच्या पेट्या विक्रीसाठी नेल्या जात असल्याची गोपनीय माहिती मेंडकी पोलीस चौकीच्या अंमलदारांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी सापळा रचून नाकाबंदी केली.

नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाटणारी निळ्या रंगाची फोर्ड फिगो कार (क्रमांक MH 31 DK 0647) पोलिसांनी थांबवली. वाहनाची झडती घेतली असता, कारमध्ये प्रत्येकी ९० एमएल मापाच्या एकूण ५० खाकी खोक्यांमध्ये लपवून ठेवलेल्या ५,००० रॉकेट संत्रा देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. जप्त केलेल्या या दारूची किंमत सुमारे २ लाख रुपये आहे, तर ३ लाख रुपयांची कार असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

या प्रकरणी कार चालक अरुण उर्फ मारोती रामचंद्र लाडवे (वय ३६) आणि दारूचा मूळ मालक हरबच्चन सिंग गुरुदीप सिंग टाक (वय ४०, दोघेही राहणार हळदा, ता. ब्रह्मपुरी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५०४/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(अ) आणि ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे आणि ब्रह्मपुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार रतन लेनगुरे, मिलिंद नैताम, मुकेश गजबे, अमोल लोनबले, अनिल आगासे, निलेश तुमसरे, स्वप्निल पळसपगार आणि इरशाद खान यांनी ही धडक कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मिलिंद नैताम करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!