Homeताज्या बातम्याजळगाव विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली;

जळगाव विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली;

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  नंदकिशोर महाजन यांना भाजपची उमेदवारी, बंडखोरीमुळे समीकरणे बदलली!
जळगाव, दि. २ जून : महाराष्ट्र विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून उमेदवारांच्या अर्ज छाननीनंतर १६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. भाजपने नंदकिशोर महाजन यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता अधिक चुरशीची आणि प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

भाजपकडून उमेदवारीची अपेक्षा असलेल्या काही दावेदारांना पक्षाने संधी न दिल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः डॉ. केतकी पाटील आणि नंदकुमार अडवाणी यांची नावे चर्चेत असतानाच त्यांचा पत्ता कट झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांचीदेखील उमेदवारी चर्चेत होती. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती. मात्र अखेर महायुतीत जागावाटपाच्या समीकरणांमुळे भाजपच्या वाट्याला ही जागा गेली आणि प्रताप पाटील यांची उमेदवारी मागे पडली.

विशेष म्हणजे, काही नाराज कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत वेगळेच रंग भरले आहेत. भुसावळ येथील दीपक धांडे आणि अनिल चौधरी यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरत निवडणुकीत उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद सदस्यांची मते निर्णायक ठरणार आहेत. एकूण ६३० मतदार असलेल्या या मतदारसंघात प्रत्येक मताला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे उमेदवारांकडून आता जोरदार संपर्क मोहीम, बैठका आणि मतदारांच्या भेटीगाठींना वेग येणार आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, भाजपचे पारडे सध्या जड मानले जात असले तरी अपक्ष उमेदवारांची भूमिका आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे अंतिम निकालावर परिणाम करू शकतात. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी न राहता शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले असून आगामी काही दिवसांत प्रचाराचा धुरळा उडणार आहे. कोण बाजी मारणार आणि कोणाला धक्का बसणार याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झाली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!