Homeताज्या बातम्यातिकीट कापल्यानंतर श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल, पालघरमध्ये खळबळ, पोलिसांकडून शोध सुरू

तिकीट कापल्यानंतर श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल, पालघरमध्ये खळबळ, पोलिसांकडून शोध सुरू

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज झालेले पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे मागच्या १५ तासांपासून नॉट रिचेबल झाले आहेत. श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही फोन बंद असून, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.

त्यामुळे पालघरमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, बेपत्ता असलेल्या श्रीनिवास वनगा यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झालं तेव्हा पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे शिंदे गटात आले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या जवळपास सर्वच आमदारांना शिंदे गटाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र केवळ श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी नाकारण्यात आली. काल त्यांच्याऐवजी राजेंद्र गावित यांना पालघरमधून उमेदवारी दिल्याचं स्पष्ट होताच श्रीनिवास वनगा यांना मोठा धक्का बसला होता. तसेच ढशाढसा रडत त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती. तू मतदारसंघात निवडून येत नाही, तुझ्याबाबतीत नकारात्मक अहवाल आलाय हे कारण देऊन मला मागेही थांबवले, मी प्रामाणिकपणे थांबलो. प्रत्येक वेळी गावितांना तिकिट दिले. जेव्हा जेव्हा चांगली संधी येते, मी चांगले काम केले तरीही मला डावलण्यात आलं असं सांगत आमदार श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले होते.

दरम्यान, श्रीनिवास वनगा हे नाराज झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांसोबत संवाद साधून श्रीनिवास वनगा यांना योग्य तो मान दिला जाईल, असं आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!