Homeसामाजिकमुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे कविसंमेलन रंगले ऑनलाईन मिळाली रसिकांची दाद...

मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे कविसंमेलन रंगले ऑनलाईन मिळाली रसिकांची दाद…

मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे कविसंमेलन रंगले ऑनलाईन मिळाली रसिकांची दाद…
पुणे : ग्रामीण मुस्‍लिम मराठी साहित्य चळवळ व महाराष्ट्र राज्य आयोजित रविवारी (ता.२१) झालेल्या एकदिवसीय दुसऱ्या ऑनलाइन साहित्य संमेलनात व्याख्यान व कवी संमेलन अशा दोन सत्रात संमेलन घेण्यात आले. त्‍याला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्‍थानी कवी ॲड. हाशम पटेल (लातूर), तर उद्‍घाटक म्‍हणून प्रख्यात समिक्षक प्रा. डॉ. अक्रम पठाण (नागपूर) तर प्रमुख पाहुणे म्‍हणून कवी के. टी. काझी (औसा), ॲड. जमील देशपांडे (जळगाव), हबीब भंडारे (औरंगाबाद) यांची उपस्‍थिती होती. पहिल्या सत्रात प्रा. डॉ. अक्रम पठाण यांनी ‘मुस्‍लिम मराठी साहित्य पार्श्चभुमी’ या विषयावर विचार मांडले. मराठी मुसलमान या फेसबुक पेजवरून ते लाईव्ह दाखविण्यात आले.
        निमंत्रित कवींचे कवीसंमेलन दुसऱ्या सत्रात कवी ॲड. हाशम इस्‍माईल पटेल यांच्या अध्यतेखाली निमंत्रित कवींचे कवीसंमेलन उत्‍साहात पार पडले. त्‍यांनी त्‍यांची  शालेय अभ्यासक्रमाला असलेली “शांतीगीत ”  या शीर्षकाची कविता सादर केली. कवी के. टी. काझी यांनी ‘काजळ’ या कवितेतून ठारच मारायचंय मला तर तलवार नको, पाजळ साहिल कोणा दुसऱ्यासाठी सजव, तु नयनात काजळ अशी परोपकार दाखविणारी कविता सादर केली. ॲड. जमील देशपांडे यांनी फादर डे निमित्त सादर केलेल्या कवितेला दाद मिळाली. त्‍यांनी बापाच्या खांद्यावर, अश्रू खुप गेली, बापाचा जनाजा होता खांद्यावर ही कविता सादर केली. कवी चॉंद तरोडकर यांनी खड्डा मनात मोठा, खोदून पाहतो, दुःखास त्‍यात आता लोटून पाहतो, स्‍वप्नात चॉंद माझ्या येईल काय ती, चल मग उगल आता झोपून पाहतो, ही कविता सादर केली. कवियत्री अनिसा शेख (पुणे) यांनी स्‍त्रीवादी कविता सादर केली. मी आजची नारी अबला नाही, कमजोर तर नाहीच नाही, आवाज उडवते अन्याया विरुध्द, वावड्या नजरांना सोडणार नाही. कवी वाय. के. शेख यांनी तुझ्याच लकबी, तुझ्यास सवयी, काळजात माझ्या बसली कवीता. कवयित्री शब्‍बाना मुल्‍ला यांनी शेतकरी कविता सादर केले. माझ्या सोन्याचा संसार, जरी पोट शेतावर, घाम गळाते अंगाचा, रोज काळ या मातीवर , कवी अहमद पिरनसाहब यांनी बोलतो मराठी, लिहतो मराठी, ऐकतो मराठी, आवडीने हा संदेश दिला.
कवी हबीब भंडारे यांनी सुन्या माळावर दर्गा, नेटात ऊरुसामधी गजबजलेली दुआ मागताना नवसाची, वचन ओठात कुजबुजलेली ही तुरबतीला आले गहिरेपण ही कविता सादर केली. कवी दाम्‍पत्य जाकीर तांबोळी व सफुरा तांबोळी यांनीही यात सहभाग घेत कवियत्री सफुरा तांबोळी यांनी कोरोनाच्या काळात ओढ लागली. मला माहेरची, माझ्या आईच्या प्रेमळ कुरवाळायची, ओढ लागली मला माहेरची माझ्या बापाच्या वत्‍सक नजरेची तसेच कवी दिलशाद सय्यद अहमदनगरकर यांनी संत गाडगेबाबा यांच्यावरील अंभग सादर केला. गरीबाचे वाली, अनाथाचे साथी, खापरच माथी, सदोदित स्‍वच्‍छतेचा नारा, घरोघरी दिला, धावे सफाईला, अंगणातही सफाईच ही कविता सादर केली. या संमेलनात कवी जाकीर तांबोळी, कवयित्री जस्‍मीन शेख, कवी बा. हा. मगदुम , ॲड. शेख इक्‍बाल रसुलसाब, अख्तर शेख, बी. एल. खान यांनीही कविता सादर केल्या. कवी खाजाभाई बागवान यांनी सूत्रसंचालन केले तर कवी शफी बोल्‍डेकर यांनी आभार मानले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!