Homeताज्या बातम्यागावी जाण्यासाठी ११ मे पासून मोफत एसटी सेवा सुरू होणार - परिवहन...

गावी जाण्यासाठी ११ मे पासून मोफत एसटी सेवा सुरू होणार – परिवहन मंत्री अनिल परब

गावी जाण्यासाठी ११ मेपासून मोफत एसटी सेवा सुरू होणार…

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतही कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. आता सरकारकडून गावी जाण्यासाठी एसटीसेवा सुरू करण्यात येणार आहे. ११ मे पासून ही सेवा सुरू केली जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे हा प्रवास मोफत असणार आहे. अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

मुंबई पुणे येथे अडकलेल्या लोकांना गावी जाण्यासाठी सोमवार ११ मेपासून एसटी सेवा सुरू होणार आहे. मुंबई, पुण्यासह विविध शहरात, गावात अडकलेल्या लोकांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे.

गावी जाण्यासाठी एसटी बसेसचं बुकिंग सुरू होणार निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. तसेच गावी जाण्याचा हा संपूर्ण प्रवास हा मोफत असणार आहे.

बुकिंग करण्यासाठी महत्वाचे मुद्दे :-

▪२२ जणांचे ग्रुप बुकिंग किंवा वैयक्तिक बुकिंगही करता येणार आहे. ग्रुप बुकिंगसाठी २२ जणांची यादी सादर करून प्रवासाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच वैयक्तिक व्यक्ती किंवा कुटुंबाला जाण्यासाठीही परवानगी घ्यावी लागणार आहे.

▪शहरी भागात ही परवानगी  पोलीसांकडून दिली जाईल तर ग्रामीण भागात ही परवानगी तहसिलदार कार्यालयाकडून दिली जाईल.

▪२२ जणांच्या ग्रुपला परवानगी मिळाली की सदर परवानगी पत्र विभागीय नियंत्रकाकडे सादर करून बसची मागणी करायची आहे. ही बस तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत जाईल.

▪वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रवास करणाऱ्यांनी MSRTC च्या पोर्टलवर जाऊन बुकिंग करायचं आहे. बुकिंग करताना परवानगी पत्र अपलोड करायचं आहे. एसटी बस पहिल्या स्टॉपला सुरू होऊन थेट शेवटचा स्टॉपला थांबेल.

▪लांब पल्ल्याच्या बसेस प्रसाधनगृहासाठी एसटीच्या डेपोतच थांबणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी खाण्या-पिण्याचं साहित्य सोबत घ्यायचं आहे.

▪बस सुटण्याआधी सॅनिटाईज केली जाईल, तसेच प्रवाशांना सोडल्यानंतर तिथून निघतानाही ती सॅनिटाईज केली जाईल.

▪प्रवाशांना मास्क बंधनकार, सॅनिटायझर वापरणे बंधनकार आहे. एका सीटवर एकच प्रवाशी बसण्यास परवानगी, झिक्झॅक पद्धतीने प्रवाशी बसणार…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!