Homeताज्या बातम्याभारतात कोरोना पेक्षाही धोकादायक आजाराची एन्ट्री, गुजरातमध्ये सापडला पहिला रुग्ण...

भारतात कोरोना पेक्षाही धोकादायक आजाराची एन्ट्री, गुजरातमध्ये सापडला पहिला रुग्ण…

भारतात कोरोना पेक्षाही धोकादायक आजाराची एन्ट्री, गुजरातमध्ये सापडला पहिला रुग्ण…

आतापर्यंत देशातील लोक कोरोना विषाणूमुळे त्रस्त झाले होते, आता कोरोना विषाणूपेक्षा अधिक धोकादायक रोग देशात आला आहे. या बातमीने सगळेच चिंतेत आले आहेत. गुजरातमधील सुरतमध्ये या आजाराची पहिली घटना आढळली असून सूरतमधील एका लहान मुलामध्ये या आजाराची लक्षणे दिसून आल्याचे सांगितले जात आहे.

या देशात आढळतो हा आजार…

या आजाराचे नाव मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम (Multisystem Inflammatory Syndrome) असे आहे. याला MIS-C असेही म्हणतात. या धोकादायक आजाराचा पहिला रूग्ण आढल्यानंतर सूरत आणि गुजरातमधील लोकांची चिंता अधिक वाढली आहे. MIS-C म्हणजेच मल्टी सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमची लक्षणे सूरत येथे राहणाऱ्या कुटूंबाच्या दहा वर्षांच्या मुलाच्या शरीरात दिसून आली आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे हा आजार फक्त अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये होतो. आणि या आजाराची बरीच प्रकरणं त्या देशातच आढळून आली आहेत.

कुटुंबाने त्यांच्या मुलाला सूरतच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या लहान मुलाला ताप असून उलट्या, खोकला, अतिसार होत आहे. तर त्याचे डोळे आणि ओठ लाल झाले असल्याचे सांगितले जात आहे. सुरतचे डॉ. आशिष गोटी यांनी मुलाला तपासल्यानंतर त्यांनी सूरत आणि मुंबईतील इतर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले. जेव्हा मुलाचा तपासणी रिपोर्ट आला तेव्हा असे आढळले की, मुलाच्या शरीरात मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमची लक्षणं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या धोकादायक रोगासह झगडणाऱ्या या मुलाच्या हृदयाचे पंपिंग ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. त्याच्या शरीरातील नसा सुजल्या आहे. यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. परंतु सात दिवसांच्या उपचारानंतर त्याला घरी पाठविण्यात आले. परंतु हा रोग देशात पसरण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे.

तर कोरोनापेक्षाही अधिक धोकादायक आजार ठरू शकतो…

३ वर्ष ते २० वर्षे वयोगटातील पौगंडावस्थेतील मुले या आजाराच्या विळख्यात येऊ शकतात. मुलांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच कोरोनासारखा हा आजार वाढला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते असे डॉक्टरांनी सांगितले आहे. MIS-C पासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याची लक्षणे लक्षात ठेवणे. मुलाला ताप, उलट्या, अतिसार, डोळे आणि ओठ लाल झाल्याचे दिसताच मुलाला ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे. यासाठी योग्य उपचार आहेत परंतु वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तो कोरोनापेक्षा अधिक धोकादायक आजार ठरू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!