पिंपरी चिंचवड :- इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर (प्रेषित मुहम्मद ﷺ ) यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील अल्पभाषित उर्दू शाळांतील मुख्याध्यापक, प्रशासकीय अधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना “मोहसीन-ए- फक्र -ए-इनसानित अवॉर्ड” ने सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष शाहाबुद्दीन एम. शेख यांच्या वतीने करण्यात आला.
सन्मानितांमध्ये पिं.चि.मनपा शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासकीय अधिकारी रजीया नियाज खान, पर्यवेक्षक खान खालेदा नुरमोहम्मद, तसेच विविध उर्दू शाळांतील मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापक, हिंदी व इंग्रजी शाळांतील मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर खिदमत-ए-अवाम फाउंडेशन यांचा समावेश होता.
या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (सामाजिक न्याय विभाग) चे उपाध्यक्ष वहाब शेख, पच्छिम महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड. तारिख भाई सिद्दिकी, रिजवान खान, फिरोज तांबोळी, नाजनीन मेमन, जन्नत बी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.






















