Homeउद्योगमालेगावच्या कुकाणे येथील शाळेत २६ लाखांचा प्रवेश घोटाळा; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे...

मालेगावच्या कुकाणे येथील शाळेत २६ लाखांचा प्रवेश घोटाळा; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

Times Of Maharashtra Desk : मालेगाव जि.नाशिक शिक्षणाच्या पवित्र मंदिरात पैशांची मोठी लूट सुरू असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून समोर आला आहे. कुकाणे येथील ‘सावित्रीबाई फुले माध्यमिक व महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालय व इंग्लिश मेडीयम स्कूल’मध्ये नियम धाब्यावर बसवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोषींवर ८ दिवसांत कठोर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

श्री तानाजी दिलीप पवार आणि इतर १७ ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाने या शाळेची सखोल चौकशी केली. या चौकशीत शाळेच्या कारभारात अनेक गंभीर आणि बेकायदेशीर अनियमितता उघडकीस आल्या आहेत.

चौकशीत उघड झालेले मोठे घोटाळे

‘फॉर्म १७’ चा गैरवापर
इयत्ता १० वी च्या १७ नंबर फॉर्मला मुख्याध्यापक थेट मंजुरी देत असून, मुंबई आणि पुण्यासारख्या बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने बसवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पालकांची आर्थिक लूट
 अनुदानित, अंशत: अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा एकाच इमारतीत बेकायदेशीरपणे चालवून पालकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जात आहे. अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांकडूनही फी वसूल करून शाळेने मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे.

२६ लाखांचा ‘अतिरिक्त प्रवेश’ घोटाळा (सर्वांत मोठा धक्का)
शाळेने विज्ञान शाखेत ११ वी आणि १२ वी च्या वर्गांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त (अनुक्रमे ३१ आणि ७२) विद्यार्थ्यांना बेकायदेशीर प्रवेश दिला. सक्षम प्राधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, शिक्षण भागाने हे प्रवेश रद्द करण्याचे आदेश देऊनही, शाळेने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची फसवणूक करून या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले. अशा एकूण १८३ अतिरिक्त विद्यार्थ्यांकडून प्रति विद्यार्थी १४,६३५ रुपये याप्रमाणे तब्बल २६ लाख ७८ हजार २०५ रुपयांची (२६,७८,२०५/- रु.) बेकायदेशीर वसुली करण्यात आली आहे.

हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर असून, महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ चा हा स्पष्ट भंग आहे. या भयंकर गैरप्रकाराची दखल घेत, यातील जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर येत्या ८ दिवसांच्या आत कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे सक्त आदेश शिक्षण विभागाने संस्था प्रमुखांना दिले आहेत.

आता या भ्रष्ट कारभारावर संस्था काय कारवाई करणार आणि गरिबांची लूट करणाऱ्यांना काय शिक्षा मिळणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!