पुणे | टाईम्स ऑफ महाराष्ट्र– दिवाळीची सुरुवात वसुबारस या दिवसापासून होत असतानाच पुणे शहर पोलिस दलात मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज (१७ ऑक्टोबर) रोजी १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमुळे अनेक पोलिस ठाण्यांमध्ये आणि शाखांमध्ये नवीन अधिकारी रुजू होणार आहेत. त्याच बरोबर काही वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना गुन्हे शाखा, तसेच आर्थिक गुन्हे शाखा आणि विशेष शाखेत नियुक्ती देण्यात आल्या आहेत.
बदली झालेल्या निरीक्षकांचे नाव, सध्याचे ठिकाण,नवीन पदस्थापना
बदली झालेल्या निरीक्षकांचे नाव, सध्याचे ठिकाण,नवीन पदस्थापना
कांचन जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा)
रवींद्र शेळके (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा ते पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा)
माया देवरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा ते पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा)
सुनील पंधरकर (नियंत्रण कक्ष ते पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा)
विजय टिकोळे (विशेष शाखा ते वाहतूक शाखा)
अजय शंकेश्वरी (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा)
संतोष सोनवणे (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा)
संदीपान पवार (विशेष शाखा ते गुन्हे शाखा)
अरुण हजारे (नियंत्रण कक्ष ते आर्थिक गुन्हे शाखा)
गुरुदत्त मोरे (नांदेड सिटी पोलीस स्टेशन ते विशेष शाखा)
दत्ताराम बागवे (विश्रांतवाडी पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा)
अंजुम बागवान (गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा)
मंगेश हांडे (गुन्हे विश्रांतवाडी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी)
स्मिता वासनिक ( गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा)
भाऊसाहेब पाटील (गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी)
कुमार घाडगे (गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा)
प्रदीप कसबे (आर्थिक गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग)
संतोष पांढरे यांची बंडगार्डन पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे पुणे शहर पोलीस दलात नवचैतन्य निर्माण होईल, तसेच आगामी सणासुदीच्या काळात कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



















