Homeताज्या बातम्या१३६वा अधिकारी बनला 'वरिष्ठ'?पुणे मनपाचा उघड भोंगळ कारभार?१३५ आरोग्य निरिक्षकांना पुणे मनपाने...

१३६वा अधिकारी बनला ‘वरिष्ठ’?पुणे मनपाचा उघड भोंगळ कारभार?१३५ आरोग्य निरिक्षकांना पुणे मनपाने डावलले?

Times of Maharashtra Desk पुणे :-
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील १८ ऑक्टोबर २०२५ च्या आदेशाने मनपा प्रशासनाचा गलथान, व्यक्तीविशेषाभोवती फिरणारा आणि वरिष्ठतेचा पुरता बोजवारा उडवणारा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. उपआयुक्त विजयकुमार थोरात यांच्या सहीने काढलेल्या आदेशानुसार आरोग्य निरीक्षक नवनाथ शेलार यांना वरिष्ठ आरोग्य निरीक्षक म्हणून पूर्णवेळ पदभार देण्यात आला आहे. पण प्रश्न असा—१३ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत जेष्ठता यादीत शेलार १३६व्या क्रमांकावर असताना, त्याच्यापुढे असलेले १३५ अधिकारी काय निष्क्रिय होते? आणि मनपा प्रशासनाला ते दिसलेच नाहीत का?

हेच नाही, तर १४ ऑगस्ट २०२५ रोजी नुकतीच बदली झालेल्या या अधिकाऱ्याला पुन्हा फक्त दोन महिन्यांत अगोदरच्याच भागात बसवले जाणे हा स्पष्ट संशयाचा वास देणारा प्रकार आहे. ज्या अधिकाऱ्याला दोन महिन्यापूर्वी बदलीची गरज होती, तोच अचानक वरिष्ठ पदासाठी “सर्वात योग्य” कसा झाला, हा प्रश्न प्रशासनातील ‘फोन कॉल, सेटिंग आणि ऑर्डर मॅनेजमेंट’ संस्कृतीकडे थेट बोट दाखवणारा आहे.

यावर अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता उपआयुक्त थोरात तोंडी सांगतात की “हा प्रभारी चार्ज आहे”. पण प्रत्यक्ष आदेशात “प्रभारी” हा शब्द एकदाही नाही. आदेशात स्पष्टपणे पूर्णवेळ वरिष्ठ पदभार म्हटलेले आहे. म्हणजे तोंडी काही, लिखित काही—सरकारी कागदांशी अशी थट्टा करूनही मनपा प्रशासनाचे चेहर्‍यावर लवलेशही लाज न दिसणे हे आणखी धक्कादायक आहे.

या आदेशात आणखी एक संशय निर्माण करणारी बाब म्हणजे कामकाज एका क्षेत्राचे, पण वेतन मात्र दुसऱ्या खात्याने द्यावे असा उल्लेख. वरिष्ठतेला बगल, पात्रांना डावलणे, वेतनात विचित्र उलटापालट आणि बदलीतली वेगळीच कसरत—संपूर्ण आदेश एका व्यक्तीसाठी खास ‘सुव्यवस्थित’ केल्याचे संकेत उघडपणे ओरडत आहेत.

या प्रकारावर मनपा कर्मचाऱ्यांमध्ये संताप असून युनियननेही भूमिका स्पष्ट केली आहे. युनियनचे अध्यक्ष उदय भट यांनी हा आदेश वरिष्ठतेचा सरळ भंग असल्याचे सांगून आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्याची खबर दिली आहे. “१३५ अधिकारी सक्षम नाहीत का, की त्यांच्याकडे पाठबळ नाही म्हणून ते बाजूला सारले?”—हा कर्मचाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात उमटणारा रोखठोक सवाल आहे.

नियम, प्रक्रिया, पारदर्शकता आणि वरिष्ठता यांच्यावर पाय ठेवून एखादा १३६वा अधिकारी ‘वरिष्ठ’ बनत असेल, तर हा प्रकार चूक, अनियमित आणि मनपा यंत्रणेवरचा अविश्वास वाढवणारा ठरतो, हे स्पष्ट आहे. पुणेकरांना स्वच्छतेची भाषा शिकवणाऱ्या विभागातच व्यवस्थेचीच घाण पसरलेली असेल, तर मनपाच्या नैतिकतेवर आणखी प्रश्न उपस्थित होणार यात शंका नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!