Times of Maharastra Desk, Parbhani District Collector car stoning : नांदेड मधील तहसीलदार अधिकाऱ्याची गाडी फोडल्याची घटना ताजी असतानाच परभणीत देखील एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाराच्या गाडीवर दगड फेक केल्याची घटना समोर आली आहे. दगड फेक करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसानी ताब्यात घेतले आहे. परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी हा प्रकार घडला आसून जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे .काल नांदेड मध्ये तहसीलदार अधिकाऱ्यांची गाडी फोडल्या नंतर आज परभणीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगड फेक करण्यात आली आहे. दगडफेक हा शेतकरी नेमका आहे तरी कोण या बद्दल अद्याप कोणतीही माहिती पोलिसानी दिलेली नाही. या घटने नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र तानावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अटक केलेल्या व्यक्तीची चौकशी चालू असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.
नांदेड मध्ये नेमके काय घडले ? या दोन्ही घटनेचा एकमेकांशी संबंध आहे का ?
काल नांदेड जिल्ह्यातील मुदखेड भागात एका शेतकऱ्याने तहसीलदार अधिकाऱ्याची गाडी फोडक्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली होती. पोलिसानी त्या शेतकऱ्याला अटक केले असून त्याचे नाव साईनाथ खानसोळे आहे अशी माहिती दिली आहे. अतिवृष्टी मुळे नुकसान झाले असून शासनाने अजून आपल्याला अनुदान दिले नाही या रागातून त्यांनी गाडी फोडली असल्याचे त्यांनी सांगितले.
काल घडलेल्या घटणे नंतर तहसीलदार अधिकाऱ्यानी आपली बाजू मांडत म्हणाले की सरकारने जाहीर केलेले अनुदान अद्यापही अनेक शेतकरींना मिळालेले नाही. शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही असे म्हणत त्याने फावड्याने गाडी फोडली परंतु साईनाथ खानसोळे या व्यक्तीच्या खात्यात या वर्षी अनुदानाचे ६२०० रुपये जमा झाले असून मागच्या वर्षी देखील त्यांना अनुदान मिळाले आहे. तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या या खुल्यासानंतर नेमका या दोन्ही प्रकरणाचा एकमेनशी काही समांध आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.






















