Homeताज्या बातम्याPune Education Update : नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील विद्यार्थिनचा अनोखा उपक्रम, विद्यार्थ्यांनी केले...

Pune Education Update : नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील विद्यार्थिनचा अनोखा उपक्रम, विद्यार्थ्यांनी केले शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचे संशोधन

Times of Maharastra Desk, Pune Education Update: नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मॉर्डन एज्युकेशन सोसाटीच्या, नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी OE ओपन एलेक्टीव्ह अंतर्गत माध्यम क्षेत्रांतील एक महत्वाचा प्रकल्प यशस्वीरीत्या राबविला आहे. हा प्रकल्प NEP 2020 च्या उद्दिष्टांची पूर्णपणे समतोल राखणार आहे. कला शाखेतील विद्यार्थ्यांना आपल्या रचनात्मक अभ्यासक्रमात इतर विद्याशाखेतील एक विषय घेऊन त्यात नाविन्यपूर्ण संशोधन करणे व त्याचा उपयोग कौशल्य शिक्षणासाठी होण्याकरिता कसा महत्वाचा आहे यावर लक्ष केंद्रित करणे.

या संशोधना दरम्यान विद्यार्थांनी माध्यम क्षेत्रांतील विविध कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन तिथले कामकाज जाणून घेतले.आणि यामधून नभोवाणी, मुद्रित माध्यमे, पत्रकारिता, दूरचित्रवाणी, चित्रपट व नवमाध्यमे यांचा इतिहास, आजवरची वाटचाल, झालेले नवीन बदल व त्याचा प्रेक्षकांवर झालेला परिणाम या सर्व मुद्यांवर त्यांनी केलेले संशोधन औचित्यपूर्ण आहे.
आजच्या काळात शैक्षणिक क्षेत्रांत आंतरविद्याशाखीय सहसंबंध प्रस्थापित होत असतांना. त्यांच्या क्षमतांचा पूर्ण विकास होण्याच्या हेतूने मॉर्डन एज्युकेशन सोसाटी, विश्वस्त प्रा. सचिन सानप, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. वसंत चाबुकस्वार, विभागप्रमुख प्रा. जयंत साळवे, प्रा.डॉ. हनुमंत लोखंडे, प्रा. डॉ. पद्मिनी माने व समन्वयक प्रा.डॉ. अभिजय वाघमारे यांनी विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.

या संपूर्ण अभ्यासत विद्यार्थ्यांची अभिरुची व विषयातील कल बघून त्यांना काही माध्यम क्षेत्रातील कार्यालयांनी / संस्थांनी आंतरवासिता करण्यास प्रोत्साहित केले. याच उपक्रमाचा भाग म्हणून महाविद्यालायकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली माध्यम क्षेत्रातील सर्व बाबींचा त्यांना जवळून अनुभव घेता यावा व आपले संशोधन कार्य सर्वांना सांगता यावे याकरिता महाविद्यालयाने त्यांना ही संधी दिलेली होती असे या परिषदेत सांगितले.

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. वसंत चाबुकस्वार यांनी एनईपीच्या दृष्टिकोनावर आणि अंमलबजावणीवर भाष्य केले. इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. जयंत साळवे यांनी ओपन इलेक्टिव्ह (ओई) प्रणालीची रचना आणि फायदे सांगितले, डॉ. लोखंडे यांनी एनईपी अंतर्गत अभ्यासक्रम निर्मितीवर चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेले शैक्षणिक व्हिडिओ सादर करण्यात आले, विद्यार्थ्यांची सर्जकता व नवीन विषय समजून घेऊन त्यावर संशोधन काम करण्याची तयारी खरोखरच अभिनंदनीय आहे. विद्यार्थ्यांनी NEP अंतर्गत त्यांचे समृद्ध करणारे अनुभव सांगितले. अशा प्रकारच्या शैक्षणिक नवोपक्रमांना प्रोत्साहन दिल्याबद्दल महाविद्यालय आणि प्राध्यापकांचे आभार मानले. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.डॉ. अभिजय वाघमारे यांनी महत्वाची भूमिका बजावली. प्रा. डॉ. पद्मिनी माने यांनी यावेळी आभार मानले.

`

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!