Homeमहाराष्ट्रलाडकी बहीण योजना बंद होणार नाही; रखडलेले हप्ते लवकरच मिळणार – मुख्यमंत्री...

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; रखडलेले हप्ते लवकरच मिळणार – मुख्यमंत्री फडणवीस

Times of Maharashtra :

राज्यातील अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचा स्पष्ट शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. जालन्यात बोलताना त्यांनी या योजनेबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.

अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपये सन्मान निधी दिला जातो. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लागू असलेल्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे हप्ते रखडले होते. यापैकी नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यात आला असून, डिसेंबर व जानेवारीचे पैसेही लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अपात्र महिलांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली होती. केवायसीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. अद्याप केवायसी न केलेल्या तसेच अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे काहींचा लाभ बंद होण्याची शक्यता असली, तरी योजना बंद होणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

यासोबतच त्यांनी “लाडक्या बहिणींना लखपती दीदी करणार” अशी घोषणाही केली. म्हणजेच महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी पुढील टप्प्यात अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!