Homeदेश-विदेशमहागाईविरोधी आंदोलन, अमेरिकेचा दबाव; इराणमध्ये मोठ्या उलथापालथीचे संकेत

महागाईविरोधी आंदोलन, अमेरिकेचा दबाव; इराणमध्ये मोठ्या उलथापालथीचे संकेत

Times of Maharashtra : वेनेजुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आता अमेरिकेचा पुढचा टारगेट कोण, यावर चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर इराण असल्याच्या अटकळींना वेग आला आहे.

इराणची राजधानी तेहरानसह देशभरात महागाईविरोधात तीव्र आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनांदरम्यान अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या परिस्थितीचा हवाला देत ट्रम्प यांनी इराण सरकारला थेट इशारा दिला आहे. आंदोलकांवर हिंसाचार केल्यास अमेरिका कठोर प्रत्युत्तर देईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

ट्रम्पच्या इशाऱ्यानंतर इराणची रणनिती बदलली

ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराण सरकार सतर्क झाले असून आंदोलने हाताळण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत थेट कारवाई करणाऱ्या सुरक्षा दलांनी आता ‘टार्गेट अटॅक’ धोरण स्वीकारल्याचे वृत्त आहे. म्हणजेच आंदोलकांवर सरसकट कारवाई न करता निवडक व्यक्तींना लक्ष्य केले जात आहे.

यासोबतच इराणच्या राष्ट्रीय संसदेत संरक्षण समितीची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून, गुप्तचर यंत्रणांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.

खामेनेई तेहरान सोडणार?

दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी वेनेजुएलातील घडामोडींमधून धडा घेत ‘प्लान बी’ तयार केल्याची माहिती समोर येत आहे. परदेशी माध्यमांच्या वृत्तानुसार, ८६ वर्षीय खामेनेई तेहरान सोडून रशियात आश्रय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

खामेनेईंच्या कुटुंबीयांसह सुमारे २० जवळच्या सहकाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याची योजना आखण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संभाव्य उत्तराधिकारी मानले जाणारे त्यांचे पुत्र मोज्तबा यांचाही या यादीत समावेश असल्याची माहिती आहे.

इतकेच नव्हे, तर खामेनेई यांच्यासोबत अब्जावधी डॉलरची संपत्तीही रशियात हलवली जाऊ शकते, असा दावा केला जात आहे. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत रशिया हेच त्यांच्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

इराणमधील वाढते आंदोलन, ट्रम्प यांच्या आक्रमक इशाऱ्यांमुळे आणि सत्तांतराच्या चर्चांमुळे मध्यपूर्वेतील राजकारण धगधगत असून, पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!