Homeताज्या बातम्या"भोंगे नकोत, मग मुस्लिम मते कशाला माकता?" काशिफ सय्यद यांचा मनसेला सडेतोड...

“भोंगे नकोत, मग मुस्लिम मते कशाला माकता?” काशिफ सय्यद यांचा मनसेला सडेतोड सवाल! काँग्रेस उमेदवार काशिफ सय्यद यांची रोखठोक भूमिका; कोंढव्यात प्रचाराला वैचारिक धार

Times of Maharashtra Desk :कोंढवा-कौसरबाग मधील लढत आता केवळ विकासाच्या मुद्द्यावर न राहता ती ‘स्वाभिमानाच्या’ मुद्द्यावर येऊन ठेपली आहे. या प्रभागात काँग्रेसचे उमेदवार काशिफ सय्यद यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा समाचार घेत काशिफ सय्यद यांनी विरोधकांना निरुत्तर केले आहे. त्यांच्या या रोखठोक भाषणाची सध्या कोंढव्यात जोरदार चर्चा आहे.

दुटप्पी राजकारणावर प्रहार प्रभाग १९ हा प्रामुख्याने मुस्लिम बहुल भाग आहे. प्रचारादरम्यान बोलताना काशिफ सय्यद यांनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले. ते म्हणाले, “एकिकडे तुमचे नेते मशिदीवरील भोंगे उतरवण्याची भाषा करतात, धर्मा-धर्मात तेढ निर्माण करणारी विधाने करतात आणि दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते त्याच समाजात येऊन मतांचा जोगवा मागत आहेत. जर तुम्हाला आमची अजान आणि भोंगे चालत नाहीत, तर मग आमची मते तरी का हवी आहेत? हा उघड उघड जातीभेद आणि मतलबीपणा नाही का?” त्यांच्या या प्रश्नामुळे विरोधकांची कोंडी झाली असून, मतदारांमध्येही याबाबत संतापाची लाट आहे.

“खरा हिंदू धर्म सहिष्णुता शिकवतो” केवळ विरोधकांवर टीका न करता, काशिफ सय्यद यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मातील उदात्त शिकवणुकीचा दाखला दिला. ते म्हणाले, “हिंदू धर्म हा अत्यंत व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. ‘इतर धर्मांचा आदर करणे’ हीच हिंदू धर्माची खरी शिकवण आणि संस्कृती आहे. मात्र, काही पक्ष राजकीय पोळी भाजण्यासाठी द्वेष पसरवत आहेत. आम्ही छत्रपती शिवरायांच्या आणि संतांच्या विचारांना मानणारे लोक आहोत, जिथे सर्वधर्मसमभावाला स्थान आहे.”

कोंढव्याच्या एकतेचा आवाज कोंढवा परिसरात हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने राहतात. मात्र, मनसेच्या ‘भोंगे’ प्रकरणातील भूमिकेमुळे येथील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न झाला होता, अशी भावना नागरिकांची आहे. अशातच काशिफ सय्यद यांनी घेतलेली भूमिका ही केवळ एका धर्माची नसून, ती संविधानाची आणि सामाजिक ऐक्याची भूमिका असल्याचे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.मतदारांचा कल स्पष्ट “ज्यांना आमचा धर्म आणि संस्कृती मान्य नाही, त्यांना आम्ही मते का द्यावीत?” हा विचार आता मतदारांच्या मनात घर करत आहे. काशिफ सय्यद यांनी विकासासोबतच समाजाच्या अस्मितेचा मुद्दा मांडल्याने, त्यांना मिळणारा पाठिंबा अधिकच वाढला आहे. काँग्रेसच्या ‘हाता’ला साथ देऊन नागरिक द्वेष पसरवणाऱ्या विचारसरणीला नाकारतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!