Homeमहाराष्ट्रदौंड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी छाया दिपक थोरात यांची सर्वानुमते निवड

दौंड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी छाया दिपक थोरात यांची सर्वानुमते निवड

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड ,मयुर साळवे)

Times Of Maharashtra : :- नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नागरिक हित संरक्षण मंडळ, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तसेच पीआरपी (कवाडे गट) यांच्या संयुक्त पाठिंब्याने नगरसेविका छाया दिपक थोरात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच स्विकृत नगरसेवक पदी राजु बारवकर व अमोल काळे यांची नियुक्ती करण्यात आली

नगरपरिषद सभागृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत उपनगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. या वेळी उपस्थित सर्व नगरसेवकांनी छाया थोरात यांच्या नावाला एकमताने पाठिंबा दिला. कोणताही विरोध न होता त्यांची निवड जाहीर करण्यात आली.

निवडीनंतर बोलताना छाया थोरात यांनी नगरपरिषदेत नागरिकांच्या मूलभूत समस्या, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व महिला–युवकांसाठीच्या विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. सर्व पक्षांच्या सहकार्याने दौंड शहराच्या विकासासाठी काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या निवडीबद्दल नागरिक हित संरक्षण मंडळ, भाजप, आरपीआय (आठवले गट) व पीआरपी (कवाडे गट) पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. शहराच्या राजकीय वर्तुळात या सर्वानुमते निवडीचे स्वागत करण्यात येत असून, आगामी काळात नगरपरिषदेत सकारात्मक व विकासाभिमुख कारभार अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

दौंड नगरपरिषदेच्या तक्रारीवरून ठेकेदाराविरुद्ध 53 जनावरांच्या अपहाराचा गुन्हा दाखल

0
दौंड,(प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दौंड शहरातील मोकाट जनावरे पकडण्याच्या कामाचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराविरुद्ध 53 गाई-बैलांचा अपहार केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ५,२२० लाभार्थ्यांना २१,४६९ शासकीय लाभांचे वितरण

0
'महसूल तुमच्या दारी' उपक्रमाला जामनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शासनाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली जळगाव| प्रतिनिधी-(विनोद पवार) जामनेर येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्साहपूर्ण वातावरणात...

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

error: Content is protected !!