Homeमहत्त्वाचेजळगाव पोलिस भरतीमध्ये ५०० पैकी १२० उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र.

जळगाव पोलिस भरतीमध्ये ५०० पैकी १२० उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र.

विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी): जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील पोलिस शिपाई पदासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून प्राथमिक टप्प्यातील चाचण्यांनंतर ५०० उमेदवारांपैकी १२० उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत. ही प्रक्रिया ११ फेब्रुवारी २०२६ पासून जिल्हा पोलिस मुख्यालयात अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडत आहे.

पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात प्रक्रिया; गैरप्रकारांना ठाम नकार 
पोलिस अधीक्षक डॉ. महेश रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची शारीरिक क्षमता, कागदपत्रांची पडताळणी आणि इतर निकषांनुसार काटेकोर छाननी करण्यात येत आहे. संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही निरीक्षणाखाली होत असून प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता राखली जात आहे.
दरम्यान, उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना किंवा अफवांना बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पोलिस भरतीसाठी पैसे देणे किंवा घेणे हा कायद्याने गुन्हा असून, अशा प्रकारची मागणी कोणी केल्यास तात्काळ पोलिस अधीक्षक कार्यालय किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असेही सांगण्यात आले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुढील टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या १२० उमेदवारांना लेखी परीक्षा व वैद्यकीय तपासणीसाठी निश्चित वेळापत्रकानुसार उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाने उमेदवारांना प्रामाणिकपणे व नियमांचे पालन करून प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

                                                ( डॉ. महेश रेड्डी – पोलिस अधीक्षक )

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक! राज्यातील एका महत्त्वाच्या पोलीस मुख्यालयात ३ महिला पोलिसांना रायफल आणि बांबूने...

0
टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या हाती लागले भयंकर पुरावे!बड्या अधिकाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): कायद्याचे रक्षण करणाऱ्या आणि महिलांच्या सुरक्षेच्या आणाभाका घेणाऱ्या पोलीस दलाला...

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!