Homeमहाराष्ट्रपरभणी महापालिकेत महाविकास आघाडीचा झेंडा; शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर, काँग्रेसचे गणेश देशमुख...

परभणी महापालिकेत महाविकास आघाडीचा झेंडा; शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर, काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर

Times Of Maharashtra Desk : परभणी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने स्पष्ट बहुमतासह सत्ता आपल्या हातात घेतली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी महापौरपदावर विजय मिळवला, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची निवड झाली.

निवडणुकीपूर्वीच शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यातील सत्तावाटपाचे समीकरण निश्चित झाले होते. त्यानुसार महापौरपद शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या करारानुसार दोन्ही पक्षांनी अधिकृत उमेदवार जाहीर करत आपल्या नगरसेवकांना व्हीप बजावला होता.

महापौर निवडीसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. या मतदानात शिवसेनेचे सय्यद इकबाल सय्यद खाजा यांना 39 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार तिरुमला मोकिंद खिल्लारे यांना 26 मतांवर समाधान मानावे लागले. स्पष्ट बहुमताच्या जोरावर सय्यद इकबाल यांनी महापौरपद पटकावले.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अक्षय देशमुख आणि रजिया बेगम यांनी भाजपला मतदान न केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ही भूमिका महाविकास आघाडीच्या विजयात निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे.

निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि काँग्रेसचे एकूण 37 नगरसेवक एकत्रितपणे एका बसमधून महानगरपालिकेच्या सभागृहाकडे रवाना झाले होते. दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकाच वाहनातून सभागृहात पोहोचल्याने आघाडीतील एकजूट सर्वांसमोर ठळकपणे दिसून आली. मतदानापूर्वी मोरया लॉन्स येथील सभागृहात नगरसेवकांची बैठक झाली आणि त्यानंतर अधिकृत निवड प्रक्रिया पार पडली.

दरम्यान, उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे गणेश देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाजमा अब्दुल रहीम यांचा 10 मतांनी पराभव केला. गणेश देशमुख यांना 37 मते मिळाली, तर नाजमा रहीम यांना 27 मते मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक अक्षय देशमुख यांनी तटस्थ भूमिका घेतली.

महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांवर विजय मिळाल्याने महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून परभणी महापालिकेत आता आघाडीचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे.

परभणी महापालिका – संख्याबळ

  • एकूण जागा : 65

  • शिवसेना (ठाकरे गट) : 25

  • काँग्रेस : 12

  • भाजप : 12

  • राष्ट्रवादी काँग्रेस : 11

  • जनसुराज्य शक्ती : 3

  • यशवंत सेना : 1

  • इतर : 1

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक! राज्यातील एका महत्त्वाच्या पोलीस मुख्यालयात ३ महिला पोलिसांना रायफल आणि बांबूने...

0
टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या हाती लागले भयंकर पुरावे!बड्या अधिकाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): कायद्याचे रक्षण करणाऱ्या आणि महिलांच्या सुरक्षेच्या आणाभाका घेणाऱ्या पोलीस दलाला...

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!