Homeताज्या बातम्यामौजा भूज येथे 'मुजरा माझ्या लावणीचा' कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन

ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला मंडळ, भूज यांच्या वतीने आयोजित “मुजरा माझ्या लावणीचा” हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लढाऊ नेते कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे युवा नेते तनय देशकर होते. तर सहउद्घाटक म्हणून वांद्रा येथील उपसरपंच गुरुदेव वाघरे आणि प्रा. सुयोग बालबुद्धे उपस्थित होते. याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष तथा उपसरपंच सुरेश ठिकरे, माजी सरपंच मोरेश्वर पाटील झोडे, सत्कारमूर्ती नानेश्वर दिवटे, सरपंच शालूताई रामटेके, पोलीस पाटील देवानंद झोडे, विलास गहाने, नंदूजी म्हस्के सर, माणिक पाटील थेरकर, पुंडलिक पाटील झोडे, गणेश वाघरे, वांद्रा येथील माजी उपसरपंच बाबुराव सातपुते, सुधीर पाटील खेवले, इंजिनिअर अविनाश म्हस्के, चंद्रभान खनखापरे, मुखरु पाटील झोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

लावणी ही महाराष्ट्राची शान: विनोद झोडगे उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना कॉम्रेड विनोद झोडगे यांनी लोककलेचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले की, “लावणी ही आपल्या महाराष्ट्राची आण, बाण आणि शान असून ती संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ही लोककला आणि आपली परंपरा जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून केवळ मनोरंजनच होत नाही, तर स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळते आणि त्यांच्या कलागुणांना चालना मिळते.” तसेच, अशा कार्यक्रमांतून सामाजिक एकात्मता वृद्धिंगत होते, त्यामुळे सर्वांनी अशा उपक्रमांना पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मंडईनिमित्त आयोजित या लावणीच्या कार्यक्रमाचा भूज आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवतरुण कला मंडळ, भूजच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जळगाव जिल्ह्यात मतदारसंघ पुनर्रचनेची शक्यता; आमदार-खासदार संख्या वाढणार?

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यातही उमटू लागले...

शिव शारदा पब्लिक स्कूलचा सीबीएसईमध्ये शंभर टक्के निकाल

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शिवाजीनगर, गढी येथील शिव शारदा पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या...

उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत स्पिरीटसह सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :  मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या हाडाखेड परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत अवैध स्पिरीटची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप जप्त...

तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे २५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : एस.व्ही.के.एम. संचालित तपनभाई मुके शभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे उदघाटन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २५ एप्रिल २०२६ रोजी...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

0
 बुलढाणा (प्रतिनिधी अनिल वायाळ) :  जिल्ह्यातील मेहकरजवळ समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 25...

error: Content is protected !!