Homeताज्या बातम्या“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले. शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती. मात्र या सर्व चर्चांदरम्यान आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना शशिकांत शिंदे म्हणाले की, “दादा असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत काही चर्चा झाल्या होत्या आणि निर्णयाचाही विचार झाला होता. त्यांच्या पक्षातील अनेक लोक याबाबत बोलत आहेत. मात्र आता आम्ही हा विषय पूर्णपणे बंद केला आहे. आम्हीच विलीनीकरणासाठी आग्रही आहोत, असे चित्र निर्माण केले जात आहे; परंतु त्यात तथ्य नाही.”

अजितदादांच्या  निधनानंतर त्यांच्या इच्छेबाबत चर्चा झाली. आम्ही फक्त सत्य मांडले. शपथपूर्वक जे बोललो तेवढेच. त्यानंतर या विषयावर आम्ही कोणतीही पुढील चर्चा केलेली नाही. दादांची इच्छा पूर्ण करायची एवढेच आम्ही म्हटले होते; मात्र आता यावर अधिक बोलायचे नाही, असा निर्णय घेतला आहे.

आम्ही फक्त आमची भूमिका मांडली 

दरम्यान, विलीनीकरणानंतर राजकीय समीकरण काय असणार होते अजित पवार गट एनडीएमध्ये राहणार होता की बाहेर पडणार होता या प्रश्नावर शिंदे यांनी सावध भूमिका घेतली. जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालानंतर पुढील निर्णय होणार होता. त्यांच्या मनात काय होते, हे त्यांच्या अनुपस्थितीत सांगणे योग्य नाही. एनडीएबाबतचा निर्णय हा आता त्यांच्याच पक्षाने घ्यायचा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.शेवटी त्यांनी नमूद केले की, इथून पुढे एनडीएसोबत जायचे की नाही, हा निर्णय आता सुनेत्रा वहिनींचा अधिकार आहे.

तूर्तास विलीनीकरण या विषयाला पूर्ण विराम !

या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील विलीनीकरणाच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!