Homeमहाराष्ट्रमंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित एका कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने या प्रकरणाची चर्चा राज्यभर रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात कार्यरत असलेल्या राजेंद्र ढेरंग या कर्मचाऱ्याने एका मेडिकल दुकानदाराकडून ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून त्याला अटक केली. या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मंत्र्यांचा स्पष्टीकरणाचा दावा

घटनेनंतर मंत्री झिरवळ यांनी या प्रकरणाशी आपला थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकरणात माझा संबंध आढळल्यास मी राजीनामा देईन, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, चौकशीत त्यांच्या खासगी सहाय्यकाने संबंधित कर्मचाऱ्यास पैसे स्वीकारण्यास सांगितल्याची माहिती पुढे आल्याची चर्चा आहे. त्यामुळे चौकशीचे धागेदोरे पुढे कोणत्या दिशेने जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नियोजित कार्यक्रम रद्द

या प्रकरणानंतर मंत्री झिरवळ यांनी आपले नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय आदिवासी साहित्य-संस्कृती संमेलनाच्या उद्घाटनासाठी ते उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे आयोजकांना निराशा झाली.

मुख्यमंत्र्यांची भेट शक्य

सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्री झिरवळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देऊ शकतात. सध्या ते नाशिकमध्ये असल्याची माहिती असून दिल्ली दौऱ्याचा कोणताही कार्यक्रम नसल्याचेही समजते.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रालयातील या कारवाईमुळे प्रशासनातील पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!