Homeमहाराष्ट्रअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधी अडकला; इकबाल अन्सारी यांची सुनेत्रा पवारांकडे तात्काळ कारवाईची...

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधी अडकला; इकबाल अन्सारी यांची सुनेत्रा पवारांकडे तात्काळ कारवाईची मागणी

Times Of Maharashtra Desk :  महाराष्ट्रातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम अद्याप वितरित न झाल्याने विद्यार्थ्यांना फी भरण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यासही मज्जाव होत असल्याची बाब समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते इकबाल अन्सारी यांनी मा. उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांना निवेदन देत शिष्यवृत्तीचा निधी तात्काळ वितरित करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे ८०० ते ९०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र, उपलब्ध निधी अत्यंत मर्यादित असल्याने पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यात विलंब होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच, दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची सक्ती रद्द करून तो किमान तीन वर्षांसाठी ग्राह्य धरावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वारंवार कागदपत्रांच्या प्रक्रियेत अडकावे लागणार नाही आणि योजना अधिक विद्यार्थी-अनुकूल बनेल, असे अन्सारी यांनी नमूद केले.

अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य या निर्णयावर अवलंबून असल्याचेही अन्सारी यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!