Homeक्राईमतहसील कार्यालयाचे पथक ॲक्शन मोडवर, अवैध रेतीविरोधातील मोहिमेत धडक कारवाई; तक्रारदारच तस्करीत...

तहसील कार्यालयाचे पथक ॲक्शन मोडवर, अवैध रेतीविरोधातील मोहिमेत धडक कारवाई; तक्रारदारच तस्करीत सापडल्याने खळबळ

रुपेश देशमुख (ब्रह्मपुरी प्रतिनिधी ) : ब्रह्मपुरी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी तहसील प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेला आता चांगलाच वेग आला आहे. तालुक्यात विविध ठिकाणी सातत्याने धाडी टाकून अवैध रेती वाहतुकीवर कठोर कारवाई केली जात आहे.

तहसीलदार सतीश मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने दि. २७ फेब्रुवारी रोजी मौजा कुर्झा येथे धडक कारवाई करत अवैधरित्या रेती वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त केला. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. सदर ट्रॅक्टर श्री. सौरभ अनिल रामटेके, रा. कुर्झा वार्ड ब्रह्मपुरी यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले. जप्त वाहन तहसील कार्यालय, ब्रह्मपुरी येथे जमा करण्यात आले असून संबंधितांविरुद्ध नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

ही कारवाई ग्राम महसूल अधिकारी श्री. भूपेन गौरे, महसूल सेवक श्री. धनपाल बोरघरे व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली.

तक्रारदारच कारवाईत सापडल्याने चर्चा

विशेष म्हणजे, अवैध रेती तस्करीविरोधात नागरिकांच्या सह्या गोळा करून तहसील कार्यालयात निवेदन देणाऱ्यांमध्ये सौरभ रामटेके यांचा पुढाकार असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होती. रेती तस्करी थांबवावी, अशी मागणी करणारी व्यक्तीच अवैध रेती वाहतुकीच्या कारवाईत सापडल्याने तालुक्यात आश्चर्य आणि खळबळ व्यक्त होत आहे.

सार्वजनिकरित्या अवैध धंद्याविरोधात भूमिका मांडणारी व्यक्तीच कारवाईत अडकणे, ही बाब प्रशासनाच्या मोहिमेला वेगळेच परिमाण देणारी ठरत आहे. “दाखवायचे एक आणि करायचे दुसरे?” असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

यापूर्वीही एक ट्रॅक्टर जप्त

यापूर्वी दोन दिवसांपूर्वीही महसूल पथकाने आणखी एक ट्रॅक्टर जप्त केला होता. सदर वाहन श्री. प्रफुल सहादेव मेश्राम, रा. बेलपातळी यांच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी श्री. चंद्रकांत ठाकरे, श्री. घनश्याम राऊत व श्री. तुषार गिरडकर यांनी सहभाग घेतला.

दोन्ही जप्त वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आली असून संबंधितांवर महसूल व खनिज नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

प्रशासनाची कठोर भूमिका

तहसील प्रशासनाच्या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे अवैध रेती तस्करांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पर्यावरण संरक्षण, नदीपात्रांचे संवर्धन आणि शासनाच्या महसुलाचे रक्षण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तहसीलदार सतीश मासाळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध उत्खनन किंवा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यास ती तात्काळ प्रशासनाला द्यावी. नागरिकांच्या सहकार्याशिवाय ही मोहीम प्रभावीपणे राबविणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर येथे शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा!

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): करवंद नाका जनसंपर्क कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन; उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप येथील शिरपूर शिवसेना जनसंपर्क कार्यालय, करवंद नाका येथे शिवसेना...

‘एक घर – एक झाड’ उपक्रमांतर्गत हजारो रोपांचे मोफत वाटप

0
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): शहरातील वाढते तापमान, प्रदूषण आणि पाणीटंचाईच्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने ‘एक घर - एक झाड’ हा महत्त्वाकांक्षी पर्यावरणपूरक...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी धरणे आंदोलन.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे): दिनांक 19 जून 2026 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बस स्टॅन्ड चौक देऊळगाव राजा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी...

६० हजारांची स्प्लेंडर चोरणारा विधीसंघर्ष बालक ब्रम्हपुरी पोलिसांच्या जाळ्यात

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): ब्रह्मपुरी येथील नागेश्वर नगर भागातून चोरीला गेलेली दुचाकी अवघ्या काही दिवसांत शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी...

कोडीद येथे जागतिक सिकलसेल दिन उत्साहात साजरा शालेय रॅली व तपासणी शिबिराचे...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) कोडीद, दि. 19 जून 2026: आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद अंतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा कोडीद व जिल्हा परिषद शाळा चाकडू व...

error: Content is protected !!