Homeमहाराष्ट्र“मोदी हटाव, देश बचाव!” घोषणांनी दणाणले मारेगाव; वंचित बहुजन आघाडीची तहसीलवर धडक

“मोदी हटाव, देश बचाव!” घोषणांनी दणाणले मारेगाव; वंचित बहुजन आघाडीची तहसीलवर धडक

देवा आत्राम ( यवतमाळ प्रतिनिधी ) : “मोदी हटाव, देश बचाव!” या घोषणांनी आज मारेगाव तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. देशाचे संविधान आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी हा लढा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मारेगाव येथेही मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

मोर्चादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. अमेरिकेसोबत झालेल्या करारांमुळे देशातील शेतकरी अडचणीत येणार असल्याचा आरोप करत या करारांचा जाहीर निषेध करण्यात आला. स्वस्त दरात सोयाबीन आणि मका आयात केल्यास स्थानिक शेतमालाचे भाव कोसळतील आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल, अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजू निमसटकर म्हणाले, “पंतप्रधानांनी अमेरिकेच्या दबावाखाली येऊन जे करार केले आहेत, त्यामुळे आपल्या सोयाबीन आणि मक्याचे भाव कोसळतील. हे सरकार केवळ इव्हेंटबाजीत मग्न असून देशाच्या सुरक्षेची यांना पर्वा नाही.” त्यांनी लोकशाही आणि संविधानावर घाला घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात एल्गार पुकारला.

आंदोलनात मारेगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि स्थानिक नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. तहसील कार्यालयासमोर निवेदन देत सरकारने शेतकरीविरोधी धोरणे तात्काळ मागे घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...

error: Content is protected !!