Homeमहाराष्ट्रगेवराईत संत नगदनारायण महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात

गेवराईत संत नगदनारायण महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात

विष्णू गायकवाड (गेवराई प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्याला संत परंपरेचा समृद्ध वारसा लाभला असून या भूमीत अनेक थोर संतांनी भागवत धर्माची पताका उंचावली आहे. संत नगद नारायण महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेवराई शहरात भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संत गजानन महाराज मंदिर येथे सुरू असलेल्या १५ व्या कीर्तन महोत्सवाची सांगता ह.भ.प. संभाजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात झाली.

यावेळी बोलताना संभाजी महाराज म्हणाले की, आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलो तरी जीवनात साधू-संतांचे आशीर्वाद घेऊन संस्कार आणि सत्यसंकल्पाने साधना केली तर ध्येयाची निश्चित प्राप्ती होते. संवादाने जीवन परिपूर्ण होते, मात्र संवाद करताना विवाद टाळावा. चिंता न करता आनंदाने जीवन जगावे आणि सुसंस्कार जपावेत, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

कीर्तनादरम्यान संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर सुंदर विवेचन करण्यात आले. तसेच आई-वडील, गायी आणि घरी आलेल्या साधूची सेवा केल्यास जीवन समाधानकारक होते, असा मौलिक संदेश त्यांनी दिला.

या सोहळ्यास ह.भ.प. महादेव महाराज भाटेपुरी, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, बाळराजे पवार, रोहित पंडित, भाऊसाहेब नाटकर आदींसह अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनानंतर प्रभूशेठ पिसाळ व गुणाजी काकडे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य, वारकरी व भजनी मंडळांनी मंडळानी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!