Homeआरोग्य१६ वर्षीय किरण सहारेला मिळाले नवेजीवन; तनय देशकर यांच्या मदतीने झाली मोफत...

१६ वर्षीय किरण सहारेला मिळाले नवेजीवन; तनय देशकर यांच्या मदतीने झाली मोफत हृदय शस्त्रक्रिया

रुपेश देशमुख  ( ब्रह्मपुरी प्रतिनिधी ) : ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथील १६ वर्षीय किरण अश्विन सहारे या मुलीवर गंभीर हृदयविकाराची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडून तिला नवजीवन मिळाले आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत पार पडली. या संपूर्ण प्रक्रियेत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्री. तनय देशकर यांच्या पुढाकारासोबतच राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभल्याने सहारे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

किरण सहारे ही हृदयविकाराच्या गंभीर आजाराने त्रस्त होती आणि तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक होते. मात्र सहारे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे उपचारासाठी मोठे संकट उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर किरणचे आजोबा श्री. धनंजय सहारे यांनी श्री. तनय देशकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून किरणच्या वैद्यकीय उपचारासाठी मदतीची विनंती केली.

ही बाब समजताच श्री. तनय देशकर यांनी तातडीने पुढाकार घेत योग्य स्तरावर पाठपुरावा केला. या संपूर्ण प्रक्रियेत राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले. यामुळे किरण सहारे हिची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे मोफत पार पडली.

दरम्यान, ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार, भाजपा नेते प्रा. अतुलभाऊ देशकर, तनय देशकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह तळोधी खुर्द येथे किरण सहारे हिच्या राहत्या घरी भेट देऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी सहारे कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला व पुढील काळातही आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी सांगितले की, समाजातील अडचणीत असलेल्या कुटुंबांना योग्य वेळी मदत मिळाली तर त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्यामुळे किरण सहारेला नवजीवन मिळाले, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

तनय देशकर यांनीही यावेळी किरणच्या प्रकृतीबद्दल समाधान व्यक्त करत तिच्या पुढील शिक्षणासाठी व भविष्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे सांगितले.

या प्रसंगी भाजपचे तालुका उपाध्यक्ष तथा तळोधीचे सरपंच श्री. अनिल तिजारे, पूर्व तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, माजी सभापती तथा तालुका सरचिटणीस प्रा. रामलाल दोनाडकर, श्री. भास्कर तिजारे, भाजपा सोशल मीडिया तालुका संयोजक श्री. धीरज पाल, श्री. धनंजय सहारे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सहारे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, माजी आमदार प्रा. अतुल देशकर व तनय देशकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

error: Content is protected !!