Homeताज्या बातम्यागोंदेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांचा पाठपुरावा; ASI महासंचालकांकडे विविध मागण्या

गोंदेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांचा पाठपुरावा; ASI महासंचालकांकडे विविध मागण्या

सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )  नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ (पराग प्रकाश) वाजे यांनी सिन्नर येथील ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिराच्या जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या.
यावेळी खासदार वाजे यांनी बाराव्या शतकातील यादवकालीन हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या गोंदेश्वर मंदिराच्या मुख्य शिखरावरील तसेच नंदी मंडपावरील काही दगडी शिळा सैल झाल्याने दुर्घटनेचा धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले. श्रावण महिन्यात मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविक आणि पर्यटक येत असल्याने तातडीने संरचनात्मक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती व संवर्धनाची कामे हाती घेण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच गोंदेश्वर मंदिरातील वर्षातून दोनदा – मार्च आणि सप्टेंबर महिन्यात – सूर्योदयाच्या किरणांचा थेट शिवलिंगावर पडणारा दुर्मिळ ‘सूर्याभिषेक’ हा स्थापत्य व खगोलशास्त्रीय वारसा जपण्यासाठी मंदिराच्या पूर्व बाजूस उंच इमारती किंवा इतर अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी नियोजनबद्ध निर्बंध लागू करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
मंदिर परिसरात स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, नियमित स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. गोंदेश्वर मंदिराचा इतिहास, स्थापत्य वैशिष्ट्ये आणि ‘सूर्याभिषेक’ची माहिती देणारे आकर्षक माहितीफलक उभारावेत तसेच मंदिराच्या गौरवार्थ स्मरणार्थ टपाल तिकीट जारी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने विचारात घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
याशिवाय मंदिराच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीपैकी केवळ दीड कोटी रुपये खर्च झाल्याची बाब मांडत उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून प्रलंबित संवर्धन, सुशोभीकरण आणि पर्यटक सुविधांची कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन

0
सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन विष्णु गायकवाड (तालुका प्रतिनिधी गेवराई) गेवराई, दि. ३१ (प्रतिनिधी) नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते टाकळगाव बॅरेजचे भूमिपूजन संपन्न

0
सिंदफणा नदीवरील सात बॅरेजच्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांना बोलणार---- सुनेत्राताई पवार अमरसिंह आणि आ. विजयसिंह पंडित यांनी शब्द पाळला विष्णु गायकवाड तालुका (प्रतिनिधी गेवराई) दि. ३१ (प्रतिनिधी) सिंदफणा नदी पाणीदार...

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

error: Content is protected !!