Homeताज्या बातम्याअण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सामाजिक, साहित्यिक व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिलेल्या ऐतिहासिक योगदानाला अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास अधिकारी उत्तम भोंडवे उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सईदा भाभी पठाण, काकासाहेब चापे, सचिन काकडे, वरिष्ठ लिपिक ताजू मुल्ला पठाण, तसेच बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नाडे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, समाजातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य, सामाजिक समतेचा संदेश आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिलेले योगदान यावर प्रकाश टाकला. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे मतही मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुभावाचा संदेश समाजात रुजविण्याचा संकल्प केला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन

0
सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन विष्णु गायकवाड (तालुका प्रतिनिधी गेवराई) गेवराई, दि. ३१ (प्रतिनिधी) नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते टाकळगाव बॅरेजचे भूमिपूजन संपन्न

0
सिंदफणा नदीवरील सात बॅरेजच्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांना बोलणार---- सुनेत्राताई पवार अमरसिंह आणि आ. विजयसिंह पंडित यांनी शब्द पाळला विष्णु गायकवाड तालुका (प्रतिनिधी गेवराई) दि. ३१ (प्रतिनिधी) सिंदफणा नदी पाणीदार...

error: Content is protected !!