Homeक्राईमदौंड तालुक्यात धक्कादायक प्रकार : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार, आरोपी अटकेत

दौंड तालुक्यात धक्कादायक प्रकार : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार, आरोपी अटकेत

दौंड ( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) : दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरात एका महिलेवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली असून या प्रकरणी दौंड पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.

दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं. 188/2026 अन्वये बी.एन.एस. कलम 64(1), 118(1), 115(2), 351(2), 352 तसेच अ.जा./अ.ज.अ. (अत्याचार प्रतिबंध) कायदा कलम 3(1)(w)(i)(ii), 3(2)(v) व आर्म अ‍ॅक्ट कलम 3, 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 25 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास मुकादमवाडी, कुरकुंभ (ता. दौंड, जि. पुणे) हद्दीत ही घटना घडली. पीडित महिला पुण्याकडे जाण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनाची वाट पाहत असताना एका काळ्या रंगाच्या कारने थांबून लिफ्ट देण्याची ऑफर दिली. चालकाने पुण्यात सोडण्याचे सांगितल्याने महिला गाडीत बसली.

मात्र काही अंतरावर गेल्यानंतर आरोपीने अश्लील बोलणे करत जबरदस्तीचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करून गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच आरोपीने बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जबरदस्तीने महिलेला खाली ओढून तिच्यावर अत्याचार केला, तसेच मारहाण करून जखमी केले.

घटनेनंतर आरोपीने महिलेला धमकावून तेथून पळ काढला. मात्र महिलेने धैर्य दाखवत गाडीचा क्रमांक लक्षात ठेवला व तक्रार दिली.

या प्रकरणी आरोपी अमोल साहेबराव काळे (रा. खडकी, ता. दौंड, जि. पुणे) याला पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पीएसआय बिद्री हे पुढील तपास करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ विशेष वृत्त: भारती विद्यापीठ ट्रॅफिक पोलिसांची नागरिकांवर उघड दहशत! नियमनाऐवजी ‘गाड्या...

0

पुणे: शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस मात्र वाहतूक नियमन करण्याऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रस्त्यावर उभे राहून नागरिकांना शिस्त लावण्याऐवजी, हे रक्षकच आता भक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ठळक मुद्दे: एका चौकात पाच ते सहा पोलिसांचा ताफा:ड्युटी दोन जणांची […]

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

error: Content is protected !!