Homeताज्या बातम्या'टाईम्स ऑफ महाराष्ट्र' विशेष वृत्त: भारती विद्यापीठ ट्रॅफिक पोलिसांची नागरिकांवर उघड दहशत!...

‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ विशेष वृत्त: भारती विद्यापीठ ट्रॅफिक पोलिसांची नागरिकांवर उघड दहशत! नियमनाऐवजी ‘गाड्या अडवण्यावर’ अधिक भर

पुणे: शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस मात्र वाहतूक नियमन करण्याऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रस्त्यावर उभे राहून नागरिकांना शिस्त लावण्याऐवजी, हे रक्षकच आता भक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे:
एका चौकात पाच ते सहा पोलिसांचा ताफा:ड्युटी दोन जणांची असताना उर्वरित कर्मचारी तिथे करतात काय?

नियमनाला हरताळ: वाहतूक कोंडी सोडवण्यापेक्षा पोलिसांचा सर्वाधिक फोकस ‘गाड्या अडवण्यावर’.
पाटणे, साळवे, नगराळे, भालेराव, खाडे… या मुजोर कर्मचाऱ्यांचा ‘आका’ कोण?

सीपी साहेबांच्या कारवाईची प्रतीक्षा: पुणे पोलीस आयुक्त या मनमानीवर कारवाईचा बडगा उगारणार का?

नेमका प्रकार काय?
सध्या भारती विद्यापीठ परिसरातील एका चौकात वाहतूक पोलिसांचा मोठा घोळका निदर्शनास येत आहे. नियमानुसार एका चौकात किंवा पॉईंटवर दोन कर्मचाऱ्यांची ड्युटी असताना, या ठिकाणी चक्क ५ ते ६ ट्रॅफिक पोलीस एकत्र घुटमळताना दिसत आहेत. या पोलिसांचा मुख्य उद्देश वाहतूक सुरळीत करणे हा नसून, केवळ दुचाकी आणि चारचाकी गाड्या अडवून वाहनचालकांना वेठीस धरणे हाच असल्याचे स्पष्ट होत आहे. या संपूर्ण प्रकाराचा एक *थेट फोटोच कॅमेऱ्यात कैद* झाला असून, या मनमानी कारभाराचे पितळ आता पुराव्यानिशी उघडे पडले आहे.

आधीच्या बातम्यांचाही शून्य परिणाम; पोलिसांना कोणाचे अभय?
यापूर्वीही भारती विद्यापीठ ट्रॅफिक पोलिसांच्या या हुकूमशाही प्रवृत्तीबाबत आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत वृत्त लावून त्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, “आमचं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही,” असाच मग्रूर आविर्भाव या पोलिसांच्या वागणुकीतून दिसून येत आहे. भारती विद्यापीठ ट्रॅफिक पोलीस आता कोणालाही घाबरत नाहीत, असेच हे गंभीर चित्र आहे.

या कर्मचाऱ्यांचा ‘आका’ कोण?
या संपूर्ण साखळीमध्ये *पाटणे, साळवे, नगराळे, भालेराव आणि खाडे* या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. ड्युटीचे कोणतेही भान न ठेवता एकाच चौकात टोळी करून उभे राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कोणाचे संरक्षण आहे? या सर्वांचा ‘आका’ कोण आहे, ज्याच्या आशीर्वादाने हे कर्मचारी सर्वसामान्यांना लुटण्याचे आणि नाहक त्रास देण्याचे धाडस करत आहेत, हा संतप्त सवाल आता पुणेकर विचारत आहेत.

सीपी साहेब, आता तरी कारवाई करणार का?
पुणे शहरात शिस्त आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होत असताना, तळागाळातील हे कर्मचारी मात्र पोलीस दलाची प्रतिमा मलिन करत आहेत. आता पुराव्यांसह हा प्रकार समोर आल्यावर, सन्माननीय पोलीस आयुक्त (CP साहेब) या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का? या सर्व मुजोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणून सोडणारी कठोर कारवाई त्यांच्यावर होणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे.

इशारा: हा तर फक्त ट्रेलर आहे!
सध्या उघडकीस आलेला हा प्रकार हिमनगाचे केवळ एक टोक आहे. भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांच्या या भ्रष्ट साखळीचे, त्यांच्या छुप्या कारभाराचे आणि त्यांच्या पडद्यामागच्या ‘आका’चे आणखी मोठे स्फोट लवकरच भाग-२ मध्ये उघडकीस आणले जातील. सत्य आणि पुराव्यांसह लवकरच पुन्हा भेटू… कारण न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

error: Content is protected !!