Homeताज्या बातम्याई-केवायसीअभावी ‘लाडक्या बहिणी’ योजनेचे अनुदान रखडले; मुदतवाढीची रागिनी मुळे यांची मागणी

ई-केवायसीअभावी ‘लाडक्या बहिणी’ योजनेचे अनुदान रखडले; मुदतवाढीची रागिनी मुळे यांची मागणी

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील हजारो महिलांना ‘लाडक्या बहिणी’ योजनेअंतर्गत मिळणारे मासिक अनुदान ई-केवायसी न झाल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून रखडले असून, या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गढी येथील रागिनी प्रतिष्ठानच्या कार्यवाहक रागिनी मुळे यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

तालुक्यातील पोस्ट खात्यांशी संबंधित अनेक महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. परिणामी, दरमहा मिळणारे १५०० रुपये अनुदान त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. विशेष म्हणजे, लाभार्थी महिलांनी पोस्ट कार्यालयात चौकशी केली असता, ‘केवायसीसंदर्भात कोणतेही आदेश नाहीत’ असे सांगण्यात आल्याची तक्रार आहे. मात्र शासन स्तरावर ई-केवायसी सक्तीची करण्यात आल्याने, निर्धारित मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे अनुदान थांबले आहे.

याशिवाय, तालुक्यातील अनेक महिला मजुरीसाठी स्थलांतरित झाल्याने त्या वेळेत ई-केवायसी करू शकल्या नाहीत. त्यामुळे त्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. अनुदान मिळवण्यासाठी महिलांना महिला व बालकल्याण विभागाच्या वारंवार चकरा माराव्या लागत असूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या मनात तीव्र नाराजी आहे.

या अनुदानावरच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने, निधी रखडल्यामुळे दैनंदिन खर्च, औषधोपचार आणि मुलांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. संबंधित विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे सामान्य व गरजू महिलांवर अन्याय होत असल्याचे रागिनी मुळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, ‘लाडक्या बहिणी’ योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करून पोस्ट खातेदार महिलांसाठी विशेष मुदतवाढ जाहीर करावी. तसेच मागील दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेले अनुदान तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या गंभीर प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन संबंधित महिलांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ विशेष वृत्त: भारती विद्यापीठ ट्रॅफिक पोलिसांची नागरिकांवर उघड दहशत! नियमनाऐवजी ‘गाड्या...

0

पुणे: शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस मात्र वाहतूक नियमन करण्याऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रस्त्यावर उभे राहून नागरिकांना शिस्त लावण्याऐवजी, हे रक्षकच आता भक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ठळक मुद्दे: एका चौकात पाच ते सहा पोलिसांचा ताफा:ड्युटी दोन जणांची […]

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

error: Content is protected !!