Homeमहाराष्ट्ररायगड जिल्हा परिषदेत १७५ कोटींचा विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर - मंगेशजी वाकडीकर यांचा...

रायगड जिल्हा परिषदेत १७५ कोटींचा विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर – मंगेशजी वाकडीकर यांचा ऐतिहासिक पुढाकार

रायगड (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : जिल्हा परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : १७५ कोटींचा विकासाभिमुख आराखडा; आरोग्य, शिक्षण व महिला सक्षमीकरणावर विशेष भर – रायगड जिल्हा परिषदेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी तब्बल १७५ कोटी ७५ लाख रुपयांचा विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कृषी आणि समाजकल्याण या प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी स्वतः हा अर्थसंकल्प सादर करत इतिहासात प्रथमच अशी नोंद झाली आहे.

अलिबाग येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, समाजकल्याण सभापती नारायण डामसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सर्वात मोठा अर्थसंकल्प

राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्काची ७७ कोटी रुपयांची थकबाकी मिळाल्यामुळे, दरवर्षी सुमारे १०० कोटींच्या आसपास असलेला अर्थसंकल्प यंदा १७५ कोटींपर्यंत पोहोचला असून, हा जिल्हा परिषदेच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला आहे.

अंगणवाड्या व शिक्षणात मोठे बदल

जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना १०० टक्के वीजजोडणी, वायफाय सुविधा आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ३ ते ६ वयोगटातील बालकांसाठी २.५० कोटींच्या गणवेश योजनेची तरतूद करण्यात आली आहे.

*शिक्षण क्षेत्रात डिजिटल युगाशी सुसंगत बदल करत* ई-लर्निंग, एलईडी संच, सीसीटीव्ही, सोलर प्रणाली आणि स्वच्छतागृह उभारणीसाठी निधी राखण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी ५० लाखांची शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली असून, ‘रायगडरत्न’ पुरस्कारातून गुणवंत खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे.

महिला सक्षमीकरणाला चालना

महिला बचत गटांना मधुमक्षिका पालन किट देऊन रोजगारनिर्मितीला चालना दिली जाणार आहे. तसेच शालेय मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन योजना राबविण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभागासाठी सुमारे १५.६८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

कृषी, पशुसंवर्धन व ग्रामीण विकास

शेतकऱ्यांना बियाणे, सौर दीपसंच व आधुनिक कृषी अवजारांवर ७५% अनुदान देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागातून जनावरांसाठी पोषणपूरक आहार, तसेच भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

समाजकल्याण व दिव्यांगांसाठी योजना

समाजकल्याण विभागासाठी ३१.३५ कोटींची तरतूद करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरण, आदिवासी भागात रस्ते विकास आणि बचत गटांना व्यवसाय साहित्य दिले जाणार आहे. दिव्यांगांसाठी घरकुल योजना व इलेक्ट्रिक बाईक योजना राबविण्यात येणार आहे.

आरोग्य व पायाभूत सुविधा

आरोग्य विभागासाठी ५.११ कोटी रुपये राखण्यात आले असून, आरोग्य केंद्रांमध्ये सोलर सिस्टीम बसविण्याची योजना आहे. ग्रामीण पाणीपुरवठा, रस्ते बांधणी, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधा यावरही मोठा निधी खर्च करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशावर लक्ष

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी निधी १० लाखांवरून १५ लाखांपर्यंत वाढविण्यात आला आहे. शिवपुण्यतिथी, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि पाणीपुरवठा योजनांसाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. तसेच महापुरुषांच्या वारशाचे जतन करण्यावर भर देण्यात आला आहे.

विशेष बाब – अध्यक्षांकडून अर्थसंकल्प सादरीकरण

चार वर्षांनंतर राजकीय पार्श्वभूमीवर सादर झालेल्या या अर्थसंकल्पात अर्थसभापतीपदाचे वाटप न झाल्यामुळे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी स्वतः अर्थसंकल्प मांडला, ही जिल्हा परिषदेच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरली आहे.

अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी (संक्षेप)

महिला व बालविकास – १५.६८ कोटी

समाजकल्याण – ३१.३५ कोटी

शिक्षण – ११.३४ कोटी

आरोग्य – ५.११ कोटी

पशुसंवर्धन – ४.११ कोटी

कृषी – ४.०५ कोटी

पाटबंधारे – ७.३६ कोटी

बांधकाम – ३६.१० कोटी

ग्रामीण पाणीपुरवठा – २६.७० कोटी

एकूणच, रायगड जिल्हा परिषदेचा हा अर्थसंकल्प ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा मजबूत करत सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाला गती देणारा ठरणार असल्याचा विश्वास अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

गावागावांत रेल्वेचा रणशिंग; ९ ऑगस्टला गोंदे फाट्यावर इतिहास घडविण्याचा निर्धार!

0
सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वकील संघ, SIMAसह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा सिन्नर, दि. ६ ऑगस्ट: नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी...

दौंड शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भाजप महिला मोर्चाची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मंजूर विकासकामे तातडीने सुरू करून अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी...

error: Content is protected !!