Homeमहाराष्ट्रजळगाव–छत्रपती संभाजीनगर दरम्यान ‘खान्देश एक्सप्रेस वे’चा प्रस्ताव

जळगाव–छत्रपती संभाजीनगर दरम्यान ‘खान्देश एक्सप्रेस वे’चा प्रस्ताव

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : 
जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या मार्गावर ‘खान्देश एक्सप्रेस वे’ उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला असून, या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रस्तावित एक्सप्रेस वे समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार असल्याने प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.

या महामार्गामुळे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवासाचा वेळ जवळपास निम्म्यावर येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यासोबतच वाहतूक कोंडी कमी होऊन उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. विशेषतः जळगाव, धुळे आणि आसपासच्या भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, या प्रकल्पासाठी खानदेश सेनेतर्फे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत होता. संघटनेचे प्रमुख सुहास दादा बोंडे यांनी 2001 पासून सातत्याने ही मागणी लावून धरली होती. त्यांच्या प्रयत्नांना आता यश येण्याची चिन्हे दिसत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक स्तरावर उमटत आहे.

राज्य सरकारकडून या प्रकल्पाबाबत प्राथमिक स्तरावरील हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत असून, लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित ‘खान्देश एक्सप्रेस वे’ पूर्ण झाल्यास खान्देश भागाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

error: Content is protected !!