Homeताज्या बातम्याक्रीडासुरेश कलमाडी यांच्या स्मरणार्थ क्रीडांगण, कन्नड संघ पुणेचा ऐतिहासिक उपक्रम

सुरेश कलमाडी यांच्या स्मरणार्थ क्रीडांगण, कन्नड संघ पुणेचा ऐतिहासिक उपक्रम

Times Of Maharashtra Desk : पुणे २५ मार्च २०२६: कन्नड संघ पुणे येथील नव्याने विकसित क्रीडा मैदानाचा उद्घाटन व नामकरण सोहळा २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता उत्साहात पार पडला. हा सोहळा संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा एक ऐतिहासिक क्षण ठरला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ. मीरा सुरेश कलमाडी उपस्थित होत्या. तसेच श्री. कुशल हेगडे (अध्यक्ष, कन्नड संघ पुणे), सौ. मालती एस. कलमाडी (सचिव, कन्नड संघ पुणे), विश्वस्त सौ. पायल कलमाडी भारतीय, आणि श्री. आदित्य भारतीय (व्यवस्थापकीय संचालक, अॅडविक हाय-टेक प्रा. लि.) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रसंगी मैदानाचे नामकरण “सुरेश कलमाडी स्पोर्ट्स सेंटर” असे करण्यात आले. दिवंगत सुरेश कलमाडी यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. अॅडविक फाउंडेशनच्या सहकार्याने साकारलेल्या या प्रकल्पातून आधुनिक क्रीडा सुविधा उभारण्याचा संकल्प दिसून येतो.

२५ डिसेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पामध्ये मैदानाचे वैज्ञानिक पद्धतीने पुनर्बांधणी, पाणीपुरवठा व ड्रेनेज व्यवस्था विकसित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार दोन बास्केटबॉल कोर्ट तयार करण्यात आले असून त्यावर अँटी-स्किड सिंथेटिक पृष्ठभाग देण्यात आला आहे. तसेच संपूर्ण मैदानात झिरो-शॅडो लायटिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

कार्यक्रमात स्वागत, प्रकल्पाची माहिती डॉ. मुक्ता करमरकर (प्राचार्य, कावेरी कॉलेज) यांनी सादर केली. मान्यवरांचा सत्कार, पुणे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनतर्फे कोर्ट प्रमाणपत्र प्रदान, तसेच व्यवस्थापन, अॅडविक प्रतिनिधी व प्रमुख पाहुण्यांची मार्गदर्शक भाषणे झाली.

अलॅक्रिटी जिम्नॅस्टिक अकॅडमीच्या प्रात्यक्षिकांनी आणि बास्केटबॉल प्रदर्शन सामन्याने कार्यक्रमात उत्साह वाढवला. कार्यक्रमाचा समारोप सौ. सुमती श्रीनिवासन यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

नवीन विकसित क्रीडांगण हे भविष्यात खेळाडू घडविण्यासाठी प्रेरणादायी केंद्र ठरणार असून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर क्रीडा विकासाला चालना देईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ विशेष वृत्त: भारती विद्यापीठ ट्रॅफिक पोलिसांची नागरिकांवर उघड दहशत! नियमनाऐवजी ‘गाड्या...

0

पुणे: शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस मात्र वाहतूक नियमन करण्याऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रस्त्यावर उभे राहून नागरिकांना शिस्त लावण्याऐवजी, हे रक्षकच आता भक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ठळक मुद्दे: एका चौकात पाच ते सहा पोलिसांचा ताफा:ड्युटी दोन जणांची […]

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

error: Content is protected !!