Homeमहाराष्ट्ररांजणी येथे श्रीराम जन्मोत्सवाची भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न

रांजणी येथे श्रीराम जन्मोत्सवाची भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : रांजणी गावात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्रीराम जन्मोत्सव समिती, ग्रामस्थ आणि परिसरातील हजारो श्रीराम भक्तांच्या सहभागामुळे संपूर्ण गावात आनंद आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिरवणुकीची सुरुवात रांजणी येथील श्रीराम मंदिरातून विधिवत पूजन करून करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आकर्षक सजवलेल्या ट्रॅक्टर रथावर श्रीरामाची भव्य प्रतिमा ठेवून डीजेच्या गजरात मिरवणूक गावभर फिरवण्यात आली. ढोल-ताशे, भजने आणि जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे उत्सवाला आणखी रंगत आली.

सायंकाळच्या सत्रात राज्याचे मंत्री मा. गिरीषभाऊ महाजन, श्री जितुभाऊ पाटील, नवलसिंग पाटील यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. त्यांच्या आगमनाने तरुणाईचा उत्साह अधिकच वाढला. मान्यवरांच्या हस्ते श्रीराम मंदिरात पूजन करण्यात आले. तसेच रांजणी येथील श्रीराम मंदिराच्या सभागृह उभारणीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा श्रीराम दरबाराची प्रतिमा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या उत्सवासाठी रांजणीसह पंचक्रोशीतील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीत सहभाग घेतला. भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकोपा यांचे सुंदर दर्शन या कार्यक्रमातून घडले.

कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फत्तेपूर पोलीस स्टेशनचे एपीआय अंकुश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच पोलीस पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला. त्यांच्या दक्षतेमुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पडला.

श्रीराम जन्मोत्सव समितीने या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले असून, ग्रामस्थांनीही त्यांना उत्तम सहकार्य केले. परिणामी, रांजणीतील हा श्रीराम जन्मोत्सव उत्साह, भक्तीभाव आणि एकतेचे प्रतीक ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!