Homeताज्या बातम्यानांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात दुर्मिळ ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’चे आगमन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साह

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात दुर्मिळ ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’चे आगमन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साह

निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : नाशिक  नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात दुर्मिळ ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’ अर्थात ‘रोजी पेलिकन’ या पक्ष्यांचे आगमन झाल्याने निसर्गप्रेमी व पक्षी अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 28 मार्च 2026 रोजी या भव्य पक्ष्यांनी अधिकृतपणे हजेरी लावल्याची माहिती वन विभागाने दिली.

नांदूर मध्यमेश्वरच्या नोंदींनुसार, अनेक वर्षांनंतर प्रथमच या प्रजातीचे दर्शन घडले आहे. महाराष्ट्रातही हा पक्षी अत्यंत दुर्मीळ मानला जातो. हे पक्षी सध्या परतीच्या स्थलांतराच्या (Return Migration) प्रवासात असून, युरोप व मध्य आशियातून आपल्या मूळ अधिवासाकडे परतत आहेत. या लांब प्रवासादरम्यान विश्रांती व अन्नासाठी त्यांनी नांदूर मध्यमेश्वर या महत्त्वाच्या रामसर स्थळाची निवड केली आहे.

‘ग्रेट व्हाईट पेलिकन’ या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी विशिष्ट प्रकाशात किंवा विणीच्या हंगामात आपल्या पांढऱ्या पिसांवर गुलाबी छटा धारण करतो, त्यामुळे त्याला ‘रोजी पेलिकन’ असेही म्हटले जाते. मोठा पंखांचा विस्तार आणि समूहाने उडण्याची क्षमता ही या पक्ष्यांची वैशिष्ट्ये आहेत.

हिरालाल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी नादुरमध्यमेश्वर वन्यजीव नाशिक
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जलाशयातील माशांची मुबलक उपलब्धता तसेच पाणथळ भागातील योग्य अधिवास निर्मितीमुळे या पक्ष्यांचे आगमन शक्य झाले आहे. हे आगमन परिसंस्थेच्या चांगल्या आरोग्याचे संकेत मानले जात असून, भविष्यात अधिक दुर्मिळ पक्षी येथे आकर्षित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यासाठी ही एक ऐतिहासिक घटना मानली जात असून, पक्षीप्रेमींसाठी हा अनोखा अनुभव ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!