Homeमहाराष्ट्रसिन्नरमध्ये धक्कादायक घटना : सख्ख्या भावांवर चाकू हल्ला, एकाचा मृत्यू

सिन्नरमध्ये धक्कादायक घटना : सख्ख्या भावांवर चाकू हल्ला, एकाचा मृत्यू

सिन्नर (नवनाथ आव्हाड ) :
सिन्नरमध्ये खळबळजनक घटना : वावी वेस भागात सख्ख्या भावांवर चाकूने हल्ला — एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
सिन्नर शहरातील वावी वेस परिसरात रविवारी रात्री उशिरा दोन सख्ख्या भावांवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या हल्ल्यात गौरव जाधव यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सिन्नर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर शहरात श्रीराम रथ मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू होती. ही मिरवणूक वावी वेस परिसरातून पुढे गेल्यानंतर काही वेळातच दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. रथ मिरवणूक एका घरासमोर येत असताना गाडी पार्किंगवरून वाद उफाळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिरवणूक पुढे गेल्यानंतर अंधाराचा फायदा घेत काही जणांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले.

या वादातूनच दोघा सख्ख्या भावांवर चाकूने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गौरव जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेत चाकूने हल्ला करणाऱ्या व्यक्तीची पत्नीही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. वाद वाढत असताना ती मध्ये पडल्यामुळे तीही जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. घटनेनंतर वावी वेस परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

या घटनेमागे भाऊबंदकीच्या वादातून हल्ला झाल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
श्रीराम रथ मिरवणुकीसारख्या धार्मिक आणि उत्सवी वातावरणात घडलेल्या या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सिन्नर शहरात शांततेचे वातावरण असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सिन्नर पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून घटनेचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. पुढील तपास सिन्नर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!