Homeमहाराष्ट्रपूल की मृत्यूचा सापळा उड्डाणपुलाच्या कामामुळे दोन दिवसांत दुसरी दुर्घटना; ट्रक उलटून...

पूल की मृत्यूचा सापळा उड्डाणपुलाच्या कामामुळे दोन दिवसांत दुसरी दुर्घटना; ट्रक उलटून मोठा अपघात

ब्रह्मपुरी  (प्रतिनिधी  रुपेश देशमुख) : ब्रह्मपुरी- नागभीड ३५३, डी, मुख्य मार्गावर सुरू असलेल्या के,सी, सी, कंपनीच्या उड्डाणपुलाच्या आणि बेजबाबदार कामामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

आज सकाळी ट्रकचे नियंत्रण सुटल्याने तो फुलाच्या अर्धवट कामाजवळ पलटी झाला
रस्ता अरुंद होता आणि बाजूला खोल खड्डा चर खणलेला होता त्यामुळे ट्रकचे नियंत्रण सुटले आणि थेट कच्चा रस्त्याखाली पलटी झाला
विशेष म्हणजे, याच ठिकाणी गेल्या दोन दिवसांतील ही दुसरी मोठी घटना असून, के,सी,सी, ठेकेदार कंपनीच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलाच्या कामामुळे मूळ रस्ता अत्यंत अरुंद करण्यात आला आहे. आज ब्रह्मपुरी वरून नागपूर मार्ग जाणाऱ्या अवजड ट्रकचा एम, एच, ४० येके. ००४८ रस्त्याच्या कडेला पुलाच्या कामासाठी खणलेल्या चरीमुळे आणि कच्च्या मातीच्या भरावामुळे ट्रकचे टायर घसरले आणि ट्रक थेट डाव्या बाजूला पलटी झाला. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

दोन दिवसांतील दुसरी घटना;
प्रशासनाचे दुर्लक्ष दोन दिवसांपूर्वीच याच ठिकाणी एसटी बस एम,एच १४ एम,एच २३५३ गडचिरोली वरून ब्रह्मपुरी नागपूर जात होती. जवळपास ४० ते ४५ प्रवासी होते. माहेर फाट्याजवळ अचानक एक दुचाकीस्वार मागच्या बाजूने वेगाने बससमोर आला त्याला वाचवण्यासाठी बस चालकाने तातडीने ब्रेक लावत गाडी डाव्या बाजूला वळवली मात्र तिथे रस्ता अरुंद होता आणि बाजूला खोल खड्डा चर खणलेला होता त्यामुळे बसचा नियंत्रण सुटले आणि ती थेट रस्त्याखाली उतरली.
अपघाताची घटना घडली होती. वारंवार अपघात होऊनही के, सी, सी, ठेकेदार कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीने साधे बॅरिकेड्स किंवा रेडियम इंडिकेटर्स देखील लावलेले नाहीत. पुलाच्या कामासाठी टाकलेले साहित्य रस्त्यावरच पडून असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी तर हा परिसर अंधारात असल्याने वाहनचालकांसाठी हा रस्ता ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे.

ठेकेदार कंपनीच्या ‘त्या’ कामावर संताप.
प्रवासाच्या आणि स्थानिक नागरिकांच्या मते, पुलाचे काम करणाऱ्या कंपनीने सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. “दोन दिवसांत दोन मोठे अपघात होऊनही कंपनीचे अधिकारी ढिम्म आहेत. पुलाच्या कामामुळे रस्ता खराब झाला असून पादचाऱ्यांसाठीही जागा उरलेली नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी आणि स्थानिक रहिवासी यांनी दिली.

वाहतूक कोंडीने नागरिक आणि प्रवासी हैराण
ट्रक पलटी झाल्यामुळे या मार्गावर बऱ्याच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, जोपर्यंत पुलाचे काम पूर्ण होत नाही किंवा पक्का पर्यायी रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही, तोपर्यंत हे अपघात थांबणार नाहीत, अशी भीती नागरिक आणि प्रवासी व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण; विचारांची आजही गरज – शिवाजीराजे जाधव

0
सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) :सिन्नर तालुक्यातील निमगाव-देवपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण व कोनशिलेचे अनावरण उत्साहात पार पडले. सिंधखेडराजा येथील राजमाता जिजाऊंचे...

खेडमक्ता येथील ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा उघड; ब्रम्हपुरी पोलिसांकडून खरबीचा आरोपी जेरबंद

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी (रुपेश देशमुख) : ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्ता येथून चोरीला गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला अवघ्या काही दिवसांत यश आले...

दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) : दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार सिन्नर तालुक्यातील पिंपळे येथील निकिता सुभाष पानसरे (शेळके) व पुनम सुभाष...

कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशात आणखी एक मानाचा तुरा तिघांची मुंबई पोलीस दलात...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला...

निफाड तालुक्यात ‘गुरव पॅटर्न’ची जोरदार चर्चा चांगल्या लोकांसाठी मदतीचा हात गुन्हेगारांसाठी कायद्याचा कठोर बडगा!

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले) : निफाड तालुक्यात सध्या पोलीस निरीक्षक श्री. गणेशजी गुरव यांच्या कार्यशैलीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष...

error: Content is protected !!