Homeमहत्त्वाचेबीडच्या सामाजिक सलोख्याचे वाहक बनू,एकोप्याचा दृढ संकल्प असाच वृद्धिंगत राहावा -आ. विजयसिंह...

बीडच्या सामाजिक सलोख्याचे वाहक बनू,एकोप्याचा दृढ संकल्प असाच वृद्धिंगत राहावा -आ. विजयसिंह पंडित

गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ईद-उल-फित्र निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड आणि शिवछत्र परिवाराच्यावतीने आयोजित ईद मिलाप कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदू – मुस्लिम बांधवांनी एकत्र येत या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. आ. विजयसिंह पंडित यांनी उपस्थित हिंदू – मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत स्नेह, बंधुता आणि एकोप्याचा दृढ संकल्प असाच वृद्धिंगत राहावा अशा सदिच्छा व्यक्त करत बीडच्या सामाजिक सलोख्याचे वाहक बनू अशी ग्वाही यावेळी उपस्थित त्यांनी दिली. या ईद-ए-मिलापच्या पहिल्याच कार्यक्रमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवछत्र परिवाराने सर्वधर्मसमभाव जपत भाईचारा आणि राष्ट्रीय एकात्मतेची गुंफण केल्याचे दिसून आले.

बीड शहरातील बशीरगंज भागातील अकबर कॅपिटल येथे रविवार दि. 29 मार्च रोजी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवछत्र परिवाराच्या वतीने ईद-ए-मिलाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. विजयसिंह पंडित यांनी उपस्थित हिंदू – मुस्लिम बांधवांना ईद-उल-फित्र निमित्त शुभेच्छा दिल्या.
आ. पंडित म्हणाले की, ईद मिलाप कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व धर्मीयांमधील स्नेह वाढीस लागतो. एकमेकांच्या सण उत्सवातील आनंदाची देवाणघेवाण करत एकमेकांना दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा या सामाजिक सलोखा वाढवणाऱ्या आहेत. सध्याच्या सामाजिक वातावरणाच्या अनुषंगाने अशा स्नेह जपणाऱ्या आणि बंधुभाव वाढीस लावणाऱ्या कार्यक्रमांची खरी गरज असल्याचे आ. विजयसिंह पंडित यांनी सांगितले. यावेळी सर्व समाज बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी आ. विजयसिंह पंडित, नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, प्रतिनिधी तथा संपादक शेख मुजीबभाई, सभापती शेख निजाम, गटनेते फारुक पटेल, स्थायी समिती सदस्य अमर नाईकवाडे, वकील सर, सभापती बाळासाहेब गुंजाळ, सभापती संजय उढान, सभापती जकी सौदागर, सभापती रंजीत बनसोडे, उपसभापती शेख बिलाल, ज्येष्ठ नगरसेवक मोईन मास्टर आदींनी उपस्थित सर्व समाज बांधवांना ईद-उल-फित्र निमित्त शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक अशफाक इनामदार, ज्येष्ठ नगरसेवक सादेक अली , खय्युम इनामदार, शेख खलील बब्बु, सय्यद इलियास, वाजेद कुरेशी, मनोज गोडसे, भीमराव वाघचौरे, भैय्यासाहेब मोरे, शेख इकबाल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवछत्र परिवारातील सदस्य यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाम मोहम्मद साकिब यांनी केले. तर आभार शेख मुजीबभाई यांनी मानले.

मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनी घेतला शीरखुर्मा आणि गुलगुल्यांचा आस्वाद
ईद-ए-मिलाप कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, औद्योगिक, पत्र कायदा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी मान्यवरांसह उपस्थित नागरिकांनी
शीरखुर्मा आणि गुलगुल्यांचा आस्वाद घेत सामाजिक सलोख्याच्या गोडवा जपला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!