Homeपर्यावरणअवकाळी पावसाचा शिरपूर तालुक्याला मोठा फटका

अवकाळी पावसाचा शिरपूर तालुक्याला मोठा फटका

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका तब्बल 30 गावांना बसला असून एकूण 480 शेतकरी बाधित झाले आहेत. प्राथमिक अहवालानुसार सुमारे 392 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे.

या अवकाळी पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः बाजरी, मका, रब्बी ज्वारी आणि गहू ही पिके आडवी पडून उत्पादनावर परिणाम झाला आहे. तसेच केळी व पपईसारख्या फळपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे चित्र दिसून आले.

शेतकऱ्यांनी आधीच उत्पादन खर्च करून पिकांची निगा राखली असताना अचानक आलेल्या या आपत्तीमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी असल्याने या नुकसानीमुळे त्यांची चिंता आणखी वाढली आहे.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने हालचाल करत संबंधित गावांतील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असून त्यानंतर शासनाकडून मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे.

तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले की, “सदर माहिती प्राथमिक स्वरूपाची असून सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासन स्तरावर प्रस्ताव सादर केला जाईल.”

शेतकरी वर्गाने तात्काळ आपल्या शेतातील नुकसानीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून मदत प्रक्रियेत कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

मार्केट यार्ड पोलिसांची कामगिरी; चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी शोधून मालकिणीला परत

0

पुणे, प्रतिनिधी : मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी अवघ्या तपासाच्या जोरावर शोधून काढण्यात मार्केट यार्ड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 139/26 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पल्लवी विठ्ठल दिघे (वय 36), रा. दिघी टॉवर, जाधव […]

error: Content is protected !!