गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील किनगाव गावात जिओ मोबाइल कंपनीचा टाॅवर असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने मोबाईलधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे
गेल्या काही दिवसापासून मोबाईलचे अचानक नेटवर्क जाणे फोन सुरू असताना अचानक कट होणे या समस्येने टाॅवर आहे नावाला मात्र रेंज नाही गावाला अशी म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आल्याची गेवराई तालुक्यातील किनगाव गावातील घटना समोर आली आहे
गावात जिओ मोबाईल कंपनीचे टाॅवर असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने मोबाईलधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रेंज मिळविण्यासाठी ग्राहक
रेंजचा शोध घेत आहेत येथे काही दिवसांपूर्वी जिओ कंपनीचे टाॅवर कार्यनिव्त केला आहे येथे खुप वर्षीच्या प्रतीक्षेनंतर जिओ कंपनीने टॉवर उभारला आहे
मात्र टॉवर लहान आणी जिओ कंपनीचे ग्राहक अधिक वाढल्याने नेट धीरे चालत आहे 4 जी 5 जी च्या नावावर महागडे रिचार्ज ग्राहक करतात मात्र नेट टुजी अवस्थेत चालत असल्याने ग्राहक पूर्ण वैतगिल आहेत
यापुढे ग्राहकांचा पैसा वाया जाऊनही नेटचा फायदा मिळत नसल्याने मोबाईल कंपनीवर नाराजी दिसून येत आहे किनगाव गावाला कोणत्याच मोबाईल कंपनीची पुरेशी रेंज नसल्याने सिमकार्ड कोणत्या कंपनीचे वापरावे असा प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे
येथील जिओ कंपनीचा टाॅवर गावातील वीज गुल होताच त्याचे नेटवर्क गायब होते त्यामुळे येथील टाॅवरला स्वातंत्र्य ट्रांसफार्मर अथवा जनरेटरची व्यवस्था करावी अशी मागणी त्रस्त नेटकयांकडुन करण्यात येत आहे
गावात जिओ कंपनीचे टाॅवर उभारून काही वर्षे लोटली गेली मात्र येथे टाॅवर असून नसल्यासारखी परिस्थिती आहे
गावात जिओ कंपनीचा टाॅवर उभारून काही वर्षी लोटली गेली मात्र येथे टाॅवर असून नसल्यासारखी परिस्थिती आहे कंपनीच्या वरिष्ठांनी दखल घेत मोबाईलधारकांच्या समस्या सोडविण्यात यावी अशी मागणी जिओ ग्राहकांच्या वतीने केली जात आहे






















