Homeमहाराष्ट्रब्रह्मपुरीत 'वडेट्टीवार स्वागत द्वारा' समोरच झळकले वाईन शॉप; शहरात उलट-सुलट चर्चांना उधाण

ब्रह्मपुरीत ‘वडेट्टीवार स्वागत द्वारा’ समोरच झळकले वाईन शॉप; शहरात उलट-सुलट चर्चांना उधाण

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी मद्यविक्रीची दुकाने थाटली जात आहेत. मात्र, ब्रह्मपुरी शहरात एका नवीन वाईन शॉपच्या स्थानावरून सध्या मोठा वाद आणि चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. आमदाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाच्या भव्य स्वागत गेटच्या अगदी समोरच एक नवीन वाईन शॉप सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ब्रह्मपुरी शहरातून प्रवेश करताना प्रवाशांचे लक्ष वेधून घेणारे वडेट्टीवारांचे स्वागत द्वार उभारण्यात आले आहे, ज्यावर राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान विधानसभा विजय वडेट्टीवार यांचे नाव आहे. मात्र, याच गेटच्या अगदी समोर दोन दिवसांपूर्वी एका मद्यविक्रीच्या दुकानाचे वाईन शॉपचे उद्घाटन झाले. एका ज्येष्ठ लोकप्रतिनिधीच्या नावाच्या गेटसमोरच अशा प्रकारे वाईन शॉप सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनतेत मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिकांचा विरोध आणि सोशल मीडियावर चर्चा
हे दुकान सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर वाईंचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. “एका बाजूला शहराची अस्मिता आणि लोकप्रतिनिधीचे नाव असलेले प्रवेशद्वार, तर दुसऱ्या बाजूला मद्याचे दुकान, हे चित्र ब्रह्मपुरीच्या संस्कृतीला साजेसे नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून उमटत आहेत. आता या वाईन शॉपमुळे या परिसराची ओळख ‘दारूचे दुकान’ म्हणून होऊ लागल्याची भीती व्यक्त होत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या दुकानाला नियमानुसार परवाना मिळाल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत आहे. मात्र, वडेट्टीवारच्या स्वागत गेटसमोर किंवा वर्दळीच्या ठिकाणी अशा व्यवसायाला परवानगी देताना स्थानिक भावना आणि नैतिक बाबींचा विचार का केला गेला नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, या मार्गावरून शैक्षणिक आणि धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते.

या वाढत्या वादामुळे आणि स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे प्रशासन या वाईन शॉपचे स्थलांतर करणार का? किंवा संबंधित लोकप्रतिनिधी यावर काय भूमिका घेणार? याकडे आता संपूर्ण ब्रह्मपुरीवासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे राजकीय विरोधकांनीही सत्ताधारी आणि प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे.

आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाने असलेल्या गेटकडे पाहून आम्ही आदराने शहरात येतो पण आता विजय वडेट्टीवारांच्या प्रवेशद्वारासमोरच वाईन शॉप दिसल्यामुळे एक प्रकारे त्या नावाचा आणि शहराच्या प्रतिमेचा अवमान होत आहे. हे दुकान त्वरित हलवण्यात यावे.

अविनाश राऊत नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ब्रह्मपुरी
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी वडेट्टीवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता त्यांच्याच नावाच्या स्वागत द्वारासमोर वाईन शॉप झळकल्याने, हा त्यांच्या धोरणांचा ‘परिपाक’ आहे
अविनाश राऊत नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ब्रह्मपुरी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!