Homeक्राईम२५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेत मोठा घोटाळा? पूर्ण पैसे अदा, काम मात्र अपूर्ण!

२५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेत मोठा घोटाळा? पूर्ण पैसे अदा, काम मात्र अपूर्ण!

जळगाव (प्रतिनिधी विनोद सुधाकर पवार):
जळगाव जिल्ह्यातील वरणगाव नगरपालिकेच्या हद्दीत राबविण्यात येत असलेल्या तब्बल २५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत मोठ्या आर्थिक अनियमिततेचा संशय निर्माण झाला असून, काम पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदाराला संपूर्ण रक्कम अदा केल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे.

या योजनेअंतर्गत शहरातील विविध भागांत जलकुंभ उभारणी, पाईपलाईन टाकणे आणि नळजोडणीची कामे हाती घेण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र सुमारे ६० टक्केच काम पूर्ण झाले असून, उर्वरित ४० टक्के काम अद्याप प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. असे असतानाही संबंधित ठेकेदार कंपनीला कोट्यवधींचे पूर्ण देयक अदा करण्यात आल्याने या व्यवहारावर संशयाचे सावट गडद झाले आहे.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तत्कालीन मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांच्या बदलीनंतरही त्यांच्या स्वाक्षरीनेच देयक मंजूर झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे प्रशासनातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही शंका व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र चौकशी समिती नेमून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी पुढे आली आहे.

याशिवाय, नगरपरिषदेमध्ये विषय समिती किंवा सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता थेट देयक मंजूर करण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता प्रशासनाने निर्णय घेतल्याचे बोलले जात असून, लोकशाही प्रक्रियेचा अवमान झाल्याची टीका होत आहे.

शहरातील प्रतापनगर, विकास कॉलनी, पवन नगर आणि सिद्धेश्वर नगर या भागांमध्ये अद्याप जलकुंभ व पाईपलाईनची कामे अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत असून, उर्वरित कामे वेळेत पूर्ण होतील का याबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
सदर प्रकरणात पारदर्शकतेचा अभाव दिसून येत असून, सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. नागरिकांचे पैसे वाया जाऊ नयेत आणि विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

निवेदनावर शिवसेनेच्या गटनेत्या तृप्ती समाधान महाजन, उपजिल्हाप्रमुख विलास भाऊ मुळे, भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुका समन्वयक सुरेश चौधरी तसेच नगरसेवक विनोद झोपे, राजेंद्र चौधरी व इरफान खाटीक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.विकास कामांमध्ये पारदर्शकता राखली असून आरोप निराधार आहेत,असे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी ठामपणे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

error: Content is protected !!