Homeमहाराष्ट्रकिनगाव ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी जय भीम घोषणांनी परिसर...

किनगाव ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी जय भीम घोषणांनी परिसर दुमदुमला

गेवराई (प्रतिनिधी  विष्णू गायकवाड) :गेवराई तालुक्यातील किनगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सरपंच रामप्रसाद चाळक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता, ज्यामुळे वातावरणात उत्साह आणि अभिमानाची भावना निर्माण झाली.

या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम जिजा चाळक, माजी सरपंच तात्यासाहेब चाळक, सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब चाळक, परमेश्वर चाळक, बाळासाहेब चाळक, राधाहरी चाळक, भगवानराव चाळक, नामदेव गायकवाड, रघुनाथ गायकवाड, अण्णासाहेब गायकवाड, शिवाजी गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, परसराम जागृत, अच्युत चाळक, मोहन चाळक, प्रल्हाद चाळक, भिवाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत संविधानिक मूल्यांनुसार आचरण करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे जयंती उत्सव शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...

error: Content is protected !!