Homeमहाराष्ट्रगढी येथील नवोदय विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनचरित्राचा...

गढी येथील नवोदय विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करावा – ॲड. सुभाष निकम

गेवराई (प्रतिनिधी  विष्णू गायकवाड) :बीड जिल्ह्यातील गढी येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या वेळी “प्रतिकूल परिस्थितीतही ज्ञान, यश आणि कर्तृत्वाची उंची गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे जीवनचरित्र अभ्यासावे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक सत्यशोधक ॲड. सुभाष निकम यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजयकुमार भोस होते. प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र बरकसे, सत्यशोधक प्रभाकर घोडके तसेच उपप्राचार्य सुधाकर वाघमारे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी भीमगीत व स्वागतगीत सादर करून वातावरण भारावून टाकले. यानंतर विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित मनोगते व्यक्त केली, तर ठाकूर सरांनी गीत सादर केले.

आपल्या प्रमुख भाषणात ॲड. निकम यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील संघर्ष, कठोर परिश्रम आणि ज्ञानाची अखंड साधना यावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. भारतीय संविधान हा मानवता, स्वातंत्र्य आणि समानतेचा अनमोल दस्तावेज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रा. राजेंद्र बरकसे आणि प्राचार्य भोस यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भीमगीतावर आधारित नृत्य व लघुनाटिका सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!