Homeमहाराष्ट्रडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे देश एकसंध – माजी खासदार समीर भुजबळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे देश एकसंध – माजी खासदार समीर भुजबळ

 निफाड (प्रतिनिर्धी उतम जाधव ): वनसगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त पंचशील बुद्ध विहारात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच भगवान गौतम बुद्ध आणि इतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्तिमत्व नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षणाच्या बळावर स्वतःचा आणि देशाचा मार्ग बदलला. त्यांनी दिलेला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षणाचा प्रसार, सामाजिक समता आणि संविधानिक मूल्यांची जपणूक यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असून बाबासाहेबांचे विचार समाजात रुजवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पांडुरंग निरभवणे यांनी बुद्ध वंदना सादर केली. माणुसकी सामाजिक फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती सागर निकाळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश बनकर यांनी केले.

सायंकाळी भव्य मिरवणूक काढून जयंतीचा समारोप करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमगर्जना मित्र मंडळाने विशेष प्रयत्न केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...

error: Content is protected !!