Homeमहाराष्ट्रशिरपूरमध्ये उन्हाळी क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात शुभारंभ विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाची...

शिरपूरमध्ये उन्हाळी क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात शुभारंभ विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाची संधी

शिरपूर  (प्रतिनिधी  तुषार शेटे) :किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिर २०२६ चा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा व कला क्षेत्राविषयी नवचैतन्य निर्माण झाले आहे.

या शिबिरात सकाळ व दुपार अशा दोन सत्रांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, स्केटिंग, बॉक्सिंग, बुद्धिबळ व कॅरम यांसारख्या क्रीडा प्रकारांसह चित्रकला, संगीत, नृत्य आदी कलाक्षेत्रातील प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांकडून दिले जाणार आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ट्रेकिंग, वॉकिंग, मॅजिक शो, वॉटर पार्क ट्रिप, चित्रकला स्पर्धा व विविध विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी विद्यार्थ्यांना मोफत क्रीडा गणवेश तसेच दिवसातून दोन वेळा पोषक आहाराची सोय करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे उपस्थित होते. यावेळी सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, संचालिका सीमाताई रंधे, उपनगराध्यक्षा संगीताताई देवरे यांच्यासह विविध मान्यवर, शिक्षक, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राकेश बोरसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन हेमंत शिरसाठ यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी क्रीडा व कला विभागातील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षणाची संधी मिळून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!