Homeआरोग्यसमृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

 बुलढाणा (प्रतिनिधी अनिल वायाळ) :  जिल्ह्यातील मेहकरजवळ समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुसदकडे जाणारी खाजगी प्रवासी बस सकाळी सुमारे सहाच्या सुमारास मेहकरजवळील फर्दोपुर टोल नाक्याजवळ अपघातग्रस्त झाली. प्रत्यक्षदर्शी आणि प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बस चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात व्यस्त होते. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस दुसऱ्या कारवर आदळली. या धडकेत कारचेही मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात जवळपास एक तास डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमींच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत आक्रोश केला.

या अपघातात एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, अपघातास जबाबदार असलेल्या चालक आणि वाहकाविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता आहे.

ही घटना पुन्हा एकदा वाहन चालवताना निष्काळजीपणा आणि मोबाईल वापराचे गंभीर परिणाम अधोरेखित करते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

खाणीत बुडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू; मारेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

0
मारेगाव (प्रतिनिधी देवा आत्राम) : नरसाळा येथील पेसा क्षेत्रात बंद पडलेल्या जुन्या दगड खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी...

जळगाव जिल्ह्यात मतदारसंघ पुनर्रचनेची शक्यता; आमदार-खासदार संख्या वाढणार?

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यातही उमटू लागले...

शिव शारदा पब्लिक स्कूलचा सीबीएसईमध्ये शंभर टक्के निकाल

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शिवाजीनगर, गढी येथील शिव शारदा पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या...

error: Content is protected !!